Mohammad Kaif Virat Kohli Unmukt Chand Prithvi Shaw Yash Dhull 5 captains bring U19 Word Cup Record Sakal
भारतीय वरिष्ठ संघ वेस्ट इंडीज विरुद्ध ऐतिहासिक 1000 वा वनडे सामना खेळण्यापूर्वी युवा टीम इंडियाने कॅरेबियन भूमीत इतिहास रचला. इंग्लंडला पराभूत करत त्यांनी पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दाखवला. नजर टाकूयात आतापर्यंत भारतीय संघाने कोणत्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलीये त्याच्यावर.... India VS England U19 WC Final Mohammad Kaif Virat Kohli Unmukt Chand Prithvi Shaw Yash Dhull 5 captains bring U19 Word Cup Check List of Record
2000 मध्ये मोहम्मद कैफच्या (Mohammad Kaif) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला अंडर 19 वर्ल्ड कप उंचावला होता. भारताने श्रीलंकेला कोलंबोच्या घरच्या मैदानावर पराभवाची धुळ चारली होती. यावेळी युवराज सिंगने कमालीची कामगिरी करु दाखवत संघाच्या पहिल्या वहिल्या अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
2008 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा बाजी मारली. यावेळी रविंद्र जाडेजा ( Ravindra Jadeja ) उपकर्णधार होता. त्याच्याशिवाय मनिष पांडेच्या रुपात टीम इंडियाला एक नवा चेहरा मिळाला होता. 2012 मध्ये उन्मुक्त चंद (Unmukt Chand)याच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्यांदा बाजी मारली. कर्णधाराने फायनलमध्ये शतकी खेळी केली होती. हनुमा विहारीनंही या स्पर्धेत चमक दाखवली होती. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये मैदान मारले होते. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखालील संघात शुभमन गिल (Shubman Gill) संघाचा उपकर्णधार होता. तो सध्या भारतीय वरिष्ठ संघाकडूनही खेळताना दिसते.यश धूलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने इंग्लंडला चार विकेट्सनी पराभूत करत अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारतीय संघाने पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. फायनलमध्ये राज बावानं अष्टपैलू कामगिरी करुन दाखवत सामनावीरचा पुरस्कार पटकावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.