Houses Demolish In Aurangabad esakal
औरंगाबाद : शहरातील लेबर काॅलनी भागातील सरकारी वीस एकर जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिसांनी बुधवारी (ता.११) पहाटे कारवाई सुरू केली. प्रचंड पोलीस बंदोबस्त, जेसीबीचा ताफा, शेकडो अधिकारी- कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. दुपारपर्यंत ३३८ घरांची सफाया करण्यात आली आहेत.
शासकीय वसाहत असलेल्या लेबर काॅलनी भाग रिकामा करण्यावरून चाळीस वर्षांपासून वाद होता.प्रशासनाने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी लेबर कॉलनीतील जागा ताब्यात घेण्यासाठी तयारी केली होती.परंतु न्यायालयीन प्रक्रिया आणि तेथील मूळ रहिवाशांची बाजू ऐकण्यासाठी आजवरचा कालावधी गेला.दरम्यान नागरिकांना घरे रिकामे करण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ देण्यात आला होता.त्यानुसार पहाटे पाच वाजेपासून अधिकारी- कर्मचाऱ्यांचा ताफा लेबर काॅलनी भागात दाखल झाला. त्यापूर्वीच बहुतांश रहिवाशांनी घरे रिकामी केली होती.तरुणीला घराबाहेर आणताना महिला पोलिस ड्रोनद्वारे टिपलेले लेबर काॅलनीचे चित्रजेसीबीने जमीनदोस्त करण्यात येत होते.या वेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रोश व्यक्त करताना महिला.कुटुंबाला घराबाहेर काढताना पोलिस.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.