फोटोग्राफी

कोण असणार IPL चा खरा बादशाह? सर्वात पुढे आहे हा विदेशी खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग 2013 च्या सीझनपासून दरवर्षी खेळाडूला मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्ड दिले जाते.

धनश्री ओतारी

यंदाच्या आयपीएल १५ व्या सीझनमध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्ड विजेताचा दावेदार राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू जोस बटलरला मानलं जात आहे. या यादीमध्ये फायनलमध्ये पोहचलेल्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आणि राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन यांचाही समावेश आहे.

15 व्या आयपीएल हंगामात 376 गुणांसह MVP पुरस्कार जिंकण्याच्या दावेदारांच्या यादीत बटलर आघाडीवर आहे. बटलर नंतर आंद्रे रसेल समोर आले आहे. त्याने 14 मॅचमध्ये ३३५ धावा केल्या आहेत. तर १७ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. रसेल मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्डच्या यादीत २८१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
यंदाच्या १५ व्या सीझनमध्ये सर्वात मोठा षटकार पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोन ठोकला. त्याची लांबी 117 मीटर होती. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या चेंडूवर हा षटकार मारला. 117 मीटर व्यतिरिक्त, त्याने आयपीएल 2022 मध्ये 108 मीटर आणि 106 मीटरचे षटकार देखील मारले. तो 265.5 गुणांसह मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्डच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर (MVP) अवार्डच्या यादीत चौथ्या स्थानावर लेग स्पिनर वानिडु हसरंगा 258 गुणांसह आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वात जास्त बळी पटकावले आहेत. त्याने यंदाच्या सीझनमध्ये २६ विकेट घेतल्या आहेत.
पाचव्या स्थानावर प्रसिद्ध कृष्णा २५६ गुणांसह आहे. युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने या हंगामात अत्यंत घातक गोलंदाजी केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या १६ सामन्यात १८ घेतल्या आहेत. आरसीबी विरुद्ध कृष्णाने हंगामातील सगळ्यात चांगली गोलंदाजी केली.
आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेला हार्दिक पांड्या २४६ गुणांसह या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे. त्याने आत्तापर्यंतच्या १४ सामन्यात ४५३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ अर्धशकांचा समावेश आहे.
या यादीत सातव्या स्थानावर के एल राहुल आहे. त्याने १५ डावात ५० पेक्षा जास्त सरासरीने ६१६ धावा त्याने केल्या आहेत. पण अंतिम टप्प्यात त्याचा संघ फ्लॉप ठरला आहे. आरसीबीविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली.
या यादीत आठव्या स्थानावर रविचंद्रन अश्विन २४१ गुणांसह आहे. त्याने १५ मॅचमध्ये १५ बळी टिपले आहेत.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन 239 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. त्याने १६ सामन्यात ४४४ धावा केल्या आहेत.
२३८ गुणांसह दहाव्या स्थानावर असणारा कागिसो रबाडाने 13 मॅचमध्ये 23 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT