दक्षिण अमेरिकेतील चिली हा देश त्याच्या सुंदर पर्वतांसाठी ओळखला जातो. येथे 20 हजार फुटांपेक्षा उंच 22 पर्वत आहेत. पण सध्या जगातील सर्वात कोरड्या वाळवंट अटाकामामध्ये असा एक पर्वत आहे, जे इतरांपेक्षा वेगळा आहे. या वाळवंटात टाकून दिलेल्या कपड्यांचा डोंगर आहे. ख्रिसमसच्या स्वेटरपासून ते स्की बूट्सपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे. पण अडचण अशी आहे की, त्यातून नवीन प्रकारचे प्रदूषण पसरत आहे. नवीन प्रकारचा कचरा निर्माण होत आहे. जे सतत वाढत चालला आहे.
येथे सेकेंडहँड आणि न विकल्या गेलेल्या कपड्यांचा ढिग वाढत आहे. इथे चीन आणि बांगलादेशात बनवलेले कपडे युरोप, आशिया आणि अमेरिकेतून पोहोचतात. हे कपडे लॅटिन अमेरिकेत म्हणजेच चिली आणि आसपासच्या देशांमध्ये विकले जातात. चिलीला दरवर्षी 59,000,000 किलोग्रॅम कपडे मिळतात. हे कपडे उत्तर चिलीमधील अल्टो हॉस्पिसिओ फ्री झोनच्या EBQ बंदरावर उतरतात. जे स्थानिक कापड व्यापारी विकत घेतात. या कपड्यांचीही तस्करी (स्मगलिंग) होते.
आता मुद्दा असा आहे की, दरवर्षी येणारे सर्वच कपडे वापरले जात नाहीत. अटाकामा वाळवंटात दरवर्षी सुमारे 39,000,000 किलोग्रॅम कपडे शिल्लक राहिले जातात. जे सतत डोंगराचे रूप धारण करत आहेत. त्याची मोठी अडचण अशी आहे की, लोक त्यांचे कपडे खूप लवकर बदलतात. ज्याला आजकाल फास्ट फॅशन क्लोथिंग म्हणतात. पण टाकलेल्या कपड्यांमुळे पसरणारा कचरा आणि प्रदूषण याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. फास्ट फॅशन कपड्यांमुळे फेकून दिलेल्या कपड्यांच्या तंतू आणि रंगांमधून रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे वातावरण खराब होते. कापड मग ते कोणत्याही प्रकारचे असो, ते पूर्ण संपायला 200 वर्षे लागतात. पण अटाकामा वाळवंटातील अल्टो हॉस्पिसियोमध्ये कपड्यांचा हा डोंगर झपाट्याने वाढत आहे. ज्याकडे आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष जात नाहीयेय.
कपड्यांच्या या डोंगरांमुळे आजूबाजूच्या भागातील सामाजिक-आर्थिक स्थिती फारशी चांगली राहिलेली नाहीयेय. झपाट्याने वाढणाऱ्या फास्ट फॅशन कपड्यांमुळे येथील कपड्यांच्या दुकानात लहान मुले व महिला काम करतात. अनेकजण कामाला येण्याजोगे कपडे शोधण्यासाठी डोंगरावरही जातात. कापड उद्योगात फार कमी पैशात लोक काम करतात. त्यामुळे येथील लोकांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र पर्यावरणाकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक स्वतः या कपड्यांच्या डोंगरावर जातात आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी कपडे शोधतात. त्यांना कधी विनामूल्य, तर कधी अगदी कमी किमतीत कपडे मिळतात. पण अनेक स्थानिक लोक या कपड्यांमधून चांगले कपडे काढतात आणि स्वतःचे छोटे दुकान उघडून त्यांची विक्री करतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना कमी किमतीत कपडे मिळतात. येथे स्थानिक लोकांचा रोजगार सुरू आहे. 2019 मधील संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2000 ते 2014 दरम्यान जागतिक स्तरावर कपड्यांचे उत्पादन दुप्पट झाले आहे. जगातील एकूण जलप्रदूषणात वस्त्रोद्योगाचा वाटा २० टक्के आहे. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येक कापड कचरा बनत नाही. तसेच त्यामुळे प्रदूषणही होत नाही. या भागात राहणारे 3 लाख लोक बहुतांशी या डोंगरांमधून कपडे काढून आपला रोजगार चालवतात. चिलीच्या या भागात इतके कपडे आहे की इथले दुकानदार ते विकूही शकत नाहीत. अडचण अशी आहे की आजूबाजूच्या देशांतील लोकांना इथल्या कपड्यांच्या पर्वतांची माहिती आहे. त्यामुळे येथून वाहतूक, साफसफाई आदी खर्च कोणीही भरू इच्छित नाही. बंदरावर काम करणारे माजी कर्मचारी अॅलेक्स कॅरेनो यांनी सांगितले की, या ठिकाणी जगभरातून कापड येते. राजधानी सॅंटियागो किंवा इतर देशांमध्ये जे कपडे विकले जात नाहीत, ते येथेच राहून जातात.चिलीच्या काही भागात टाकाऊ कपड्यांचा पुनर्वापर केला जातो. येथून रिसायकल केलेले कपडे लाकडी विलगीकरण पॅनल्समध्ये टाकले जातात. जेणेकरून सामाजिक बांधणीच्या इमारतींच्या भिंती ऋतूनुसार थंड व गरम करता येतील. येथे उपस्थित असलेल्या इकोफिब्रा आणि इकोसिटेक्स या दोन कंपन्या कपड्यांचे रीसायकल करतात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे काम करते. जेणेकरून त्यांच्यापासून विविध प्रकारची उत्पादने बनवता येतील. इकोफिब्राचे संस्थापक फ्रँकलिन झेपेडा म्हणाले की, फॅब्रिक्स (कपडे) बायोडिग्रेडेबल नसतात. पण त्यात रसायने असतात. त्यामुळे महापालिका त्यांना कचरा डेपोत ठेवत नाही. हे कपडे कचरा डेपोत आणू नयेत यासाठी स्थानिक प्रशासन आणि सरकारने एक सोपा मार्ग शोधला आहे. पण इथेच ते धोका पत्करत आहेत. हे कपडे रिसायकल करून जगभर पाठवल्यास स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि देशाला महसूल मिळेल. इकोफाइब्रा (EcoFibra) आणि इकोसिटेक्स (Ecocitex) या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या कारखान्यांमध्ये रिसायकल केलेल्या कपड्यांपासून बनवलेल्या नवीन उत्पादनांची विक्री करण्यासाठी स्टोअर्स उभारल्या आहेत. म्हणजेच फॅक्टरी आउटलेट. अशा दुकानांची फ्रँचायझी घेऊन रिसायकल केलेल्या वस्तू विकण्याचे कामही काही स्थानिक लोक करत आहेत. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.