MP Udayanraje Bhosale met on Devendra Fadnavis at mumbai esakal
साताऱ्यात भाजपाचे दोन तर शिवसेनेचे म्हणजेच, एकनाथ शिंदे गटाचेसुद्धा दोन आमदार आहेत.
सातारा : राज्यात सत्तेची उलथापालथ झालेली असताना आता नजरा भाजपाच्या (BJP) सत्तेत येण्याच्या लागल्या असून कोणाला कोणतं खातं मिळणार यावर चौकाचौकांमध्ये गप्पा सुरू झाल्या आहेत. साताऱ्यात भाजपाचे दोन तर शिवसेनेचे म्हणजेच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचेसुद्धा दोन आमदार आहेत.भाजपाचे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले हे तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), महेश शिंदे हे आमदार असून यामध्ये मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.महेश शिंदे आणि जयकुमार गोरे हे दोन्ही आमदार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा फडणवीसांसोबत सलगी राखून आहेत, त्यामुळं या तिघांमध्ये सध्या मंत्रिपदासाठी रस्सीखेच असणार आहे.शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत मर्जीतले मानले जातात, त्यामुळं शंभूराज यांना कॅबिनेट ठरलेलंच आहे, अशी चर्चा आहे. या सर्वांमध्ये खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा रोल महत्त्वाचा मानला जातोय. खासदार उदयनराजे हे सरकार कोसळल्यानंतर लगेच सकाळीच मुंबईसाठी रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीमध्ये नक्की कोणासाठी शब्द टाकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. (फोटो : प्रमोद इंगळे)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.