Udayanraje Bhosale esakal
उदयनराजेंना गाड्यांचा छंद आहे, तसंच गाड्यांसाठी ते 007 हा क्रमांक आवडीनं घेतात.
सातारा : उदयनराजे (Udayanraje Bhosale) हे साताराच नव्हे, तर राज्यभरातील जनतेचा औत्सुक्याचा विषय असतो. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो.युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कस ग सांगू.. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचे नेहमी सर्वांना आकर्षण असते. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे.खासदार उदयनराजे भोसलेंचे काही गोष्टींचे शौक निराळेच असतात. त्यांनी नुकतीच पुण्यातून बीएमडब्लू गाडी विकत घेतलीय. पुण्यातील बवेरियन मोटर्स प्रा. ली. येथील त्यांनी बीएमडब्लू (BMW) या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. या गाडीचा नंबरही त्यांच्या नेहमीच्या म्हणजेच, जेम्स बॉन्ड (James Bond) नंबरशी निगडीत....007.उदयनराजेंना गाड्यांवर भलतच प्रेम आहे. त्यांच्याकडच्या प्रत्येक गाड्यांचा एक इतिहासच झाला, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी त्यांच्या जीवनात कमी वयात पहिल्यांदा वाहन खरेदी केले ते जिप्सी. जिप्सी काही काळ वापरल्यानंतर त्यांनी लगेचच महिंद्रा कंपनीची (Mahindra Company) त्यावेळची थार गाडी विकत घेतली. त्यानंतर टाटा सियार, टाटा इस्टेट, स्क्रार्पिओ, मर्सडिज, ऑडी, सफारी, पजेरो, अशा असंख्या गाड्यांचा शौक त्यांनी पूर्ण केला.सध्या त्यांच्याकडं फोर्ड इंडीवर MH 11 AB 007 ही गाडी होती. त्यानंतर त्यांनी बीएमडब्लू या कंपनीची TEX 5 ही पुण्यातून खरेदी केलीय.उदयनराजेंना गाड्यांचा छंद आहे, तसंच या गाड्यांसाठी ते 007 हा क्रमांक आवडीनं घेतात. त्यांच्याकडं पल्सर बाईकसह इनोव्हा (Innova), जिप्सी, रेंज रोव्हर, फोर्ड या कंपन्यांच्या अलिशान गाड्या आहेत. तसेच त्यांना बुलेटचीही आवड आहे. ते त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची बुलेट घेऊन सातारा शहरातून कधी-कधी आवडीनं फेरफटकाही मारतात.उदनराजेंचा राजकारणापेक्षा जास्त ओढ हा महाविद्यालयात शिकत असताना वाहनांमध्ये आणि रेसिंगमध्ये होता. त्यांचे शिक्षण परदेशात ऑटोमोबाईल इंजिनियरींगमधून (Automobile Engineering) झालं. शिवाय, लंडनमधून त्यांनी एमबीए देखील केलं. या कालावधीत त्यांना छंद लागला तो रेसिंगचा. लंडन, जर्मनी, फ्रान्स या देशात ते कामयच रेसींगच्या ट्रॅकवर दिसत होते.उदनराजेंच्या या छंदाचा धसका त्यांच्या आजी म्हणजेच, राजमाता सुमित्राराजे भोसले (Rajmata Sumitraraje Bhosle) यांनी घेतला होता. त्यामुळं त्यांच्या बद्दल त्या त्यांना कायमच टोकत होत्या, तर दुसरीकडं वडिलांचं म्हणजेच, प्रतापसिह महाराजांचं उदयनराजेंच्या कमी वयात वडिलांचं छत्र हरपल्यामुळं राजमाता कल्पनाराजे (Rajmata Kalpanaraje) ह्या कायमच त्यांच्याबद्दलची काळजी करत होत्या.शिवाय, त्यांनी शिक्षण संपल्यानंतर लवकरच भारतात यावे असा आग्रह त्यांच्याकडून झाला. उदयनराजे जेव्हा भारतात म्हणजेच, साताऱ्यात आले. तेव्हा ते आपोआपच राजकारणात गुरफटत गेले आणि त्यांना त्यांचा गाड्यांचा आणि रेसिंगचा छंद हा कालांतरानंतर मनातच दाबून ठेवावा लागला.ही मनातील खंत मात्र ते अनेकवेळा आपल्या जवळच्या मित्रांसोबत कायमच शेअर करत असतात. परंतु, आजही एखादा भारदस्त वाहन त्यांच्या हातात आले तर ते सातारा शहराबरोबर कास परिसरात फिरायला जातात.असाच काहीसा प्रकार साताऱ्यात पाहायला मिळाला. उदयनराजेंच्या एका चाहत्यानं आपल्या ओपन ऑडी कार मधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली. मग काय? विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये (Audi Car) स्वार होत सातारा शहरामधून अर्धा तास फेरफटका मारला. (PHOTO : Pramod Ingle)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.