रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी भारतीय रेल्वे खात्यानं दिलीयं. पश्चिम रेल्वेवरील मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला तेजस एक्स्प्रेसच्या डब्यात रुपांतरित केले आहे. भारतीय रेल्वेमध्ये विशेष तेजस प्रकारच्या स्मार्ट स्लीपर कोचसह प्रथम रेकचे उद्घघाटन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेमार्फत तेजस स्लीपर कोच रेक चालविण्याची सुरूवात केली आहे. (Mumbai Delhi Rajdhani Exp with Tejas Sleeper type coaches designed interiors yst88)
पश्चिम रेल्वेवरील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रीमियम ट्रेनमधील गाडी क्रमांक 02951/52 मुंबई-नवी दिल्ली राजधानी विशेष एक्सप्रेस आहे. मात्र, या गाडीला नवीन तेजस प्रकारातील डबे जोडून स्लीपर कोचमध्ये बदल केला आहे. आतापर्यंत दोन राजधानी एक्स्प्रेसला तेजस प्रकारातील स्लीपर कोच रेकमध्ये रुपांतरित केला आहे. पहिला रेक फेब्रुवारी 2021 मध्ये आगरताळा-आनंद विहार टर्मिनस राजधानी एक्स्प्रेसला तेजस एक्स्प्रेसमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. तेजस स्मार्ट स्लीपर कोचची सुविधा असलेला भारतीय रेल्वेतील पहिला कोच आहे. नवीन ट्रेनमध्ये प्रवाशांना सुरक्षा आणि आरामदायक सेवा वाढविण्यासाठी विशेष स्मार्ट फिचर्स दिले आहेत. स्मार्ट कोचमध्ये इंटिलिजेंट सेंसर सुविधा बसविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळेल. जीएसएम नेटवर्क कनेक्टिविटी बसविली आहे. सीसीटीव्ही रेकाॅर्डींग, टाॅयलेटमध्ये गंध सेंसर, पॅनिक बटण, अग्निशोधक यंत्र अलार्म सुविधा, अग्निशमक यंत्र ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक डब्यामध्ये दोन एलसीडी बसविण्यात आल्या आहेत. याद्वारे प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील. फ्लॅश टाइप एलईडी डिजिटल डेस्टिनेशन बोर्ड प्रत्येक डब्यात बसविण्यात आला आहे. याद्वारे गाडी क्रमांक आणि डब्यांच्या प्रकाराची माहिती दिली जाईल.
प्रत्येक डब्यात सुरक्षेच्या कारणास्तव सहा कॅमेरे, लाइव रिकाॅर्डिंग केली जाणार आहे. दिवसातील प्रकाशात आणि रात्रीच्या अंधारात दृश्य व्यवस्थित कैद करता येतील, असे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. संपूर्ण ट्रेनचे दरवाजे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत ट्रेन सुरू होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.