केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे मंगळवारी सकाळपासूनच शहरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली.
शिवसेनेकडून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यापासून ते गुडलक हॉटेलजवळच्या चौकात आंदोलन आणि त्यानंतर आर डेक्कन मॉल येथे एकाने तरुणाकडून दगड मारण्याच्या घटना घडल्या.दरम्यान, भाजपाच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयाबाहेर तत्काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक राणे यांची चौकशी करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले.नारायण राणे यांनी सोमवारी (23 ऑगस्ट) झालेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याविरुद्ध युवासेनेचे कोथरुड विभागाचे सरचिटणीस रोहित रमेश कदम (वय 29, रा. पाषाण) यांनी चतु:शुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांचे एक पथकराणे यांची चौकशी करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक हॉटेलजवळच्या चौकात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तेथे हजर होते.आंदोलनात घोषणाबाजी झाल्यानंतर आंदोलक निघुन गेले. त्याचवेळी नारायण राणे यांच्या डेक्कन येथील आर.डेक्कन या मॉलवर एका तरुणाने दगड फेकून मारला. त्यामध्ये मॉलच्या काचेला तडा गेला. दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याने भाजपाच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयाबाहेर तत्काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.