Maha Rangoli on Godaghat esakal
Nashik : महानगरपालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गोदाकाठावर सोमवारी साकारण्यात आलेली वसुधैव कुटूंबकम थीमवरील पंचमहाभुत ही महारांगोळी. चला पाहुया या महारांगोळीचे विलक्षण अशी छायाचित्रे.
पर्यावरण रक्षण या अंतर्गत पंचमहाभूते या विषयाला अनुसरुन 25 हजार स्क्वेअर फुट इतकी महारांगोळी गोदातिरी साकारण्यात आली.यासाठी शहराच्या विविध भागांतून तब्बल 500 महिलांनी सहभाग नोंदविला. पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी आहे. रांगोळी मध्ये मधोमध पंचमहाभूतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे.सूर्य आणि पृथ्वी देखील साकारण्यात आली आहे. मानवी शरीर, पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतानी बनलेले आहे हे दाखवण्यासाठी रांगोळीमधे त्यांचा अंतरभाव केला आहे.पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे दाखवण्यासाठी वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत.पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून वसुधैव कुटुंबकम् असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे.या महारांगोळी साठी एकूण २५०० किलो रंग आणि २००० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून २०० महिलांनी अवघ्या तीन तासांत एकत्रितपणे येऊन हि हि महारांगोळी साकारली होती. सकाळी ६ वाजता या महारांगोळीचा पहिला बिंदू हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या मेघवाल समाजाचे थोर समाजसेवक श्री रामजी पाळजी मारू, यांच्या सूनबाई श्रीमती हिरुबेन धुडा मारू व श्री राम पला मारू, दिपाली गीते यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आला. esakalesakalसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.