जगभरामध्ये विविध सण साजरा करण्यासाठी भारत ओळखला जातो. येथे दर महिन्यांमध्ये कोणता कोणता सण साजरा करतात. सण छोटा असो किंवा मोठा, लोक पूर्ण उत्साह आणि आनंदाने साजरा करतात. सण साजरा करण्याची पध्दत वेगवेगळी असली तर सगळीकडे दिसणारा उत्साह पाहण्यासारखा असतोय. शारदीय नवरात्र हा सण दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला शुक्ल पक्षामध्ये येतो. सर्व भक्त श्रध्दा आणि भक्तीभावाने दुर्गामातेची नऊ दिवस पूजा करतात. या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरवात 7 ऑक्टोबर झाली असून 14 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे. 15 ऑक्टोबरला विजयादशमीचा सण साजरा होणार आहे. हा सण साजरा करण्याचा प्रत्येकाची पध्दत वेगवेगळी असते पण, सगळीकडे संपूर्ण 9 दिवस हा सण उत्साहमध्ये साजरा होतो. 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर दसरा/ विजयादशमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी दुर्गामातेच्या मुर्तीचे विर्सजन केले जाते. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व असते. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने दुर्गामातेची पूजा होते. प्रत्येकजण मनोभावे आपल्या पद्धतीने देवीची मनोभावे पूजा करतात. चला जाणून घेऊ या देशात विविध ठिकाण कसा साजरा होतो नवरात्री उत्सव
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा :
नवरात्रीमध्ये पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा जगभर प्रसिध्द आहे. हा उत्सव साजरा करताना येथे सहाव्या दिवसापासून देवीचे आवाहन सुरू होते आणि दहाव्या दिवसापर्यंत सुरू असते. याठिकाणी देवी दुर्गाला मुलगी समजून पूजा केली जाते जी सासरहून माहेरी आलेली असते. नवरात्रीमध्ये येथे खास पंडाल (मंडप) उभारले जातात जिथे दुर्गामातेची मुर्ती ठेवली जाते. दर्शनासाठी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि दुर्गा मातेची विशेष आरतीही केली जाते. या काळात बंगाली महिला आपली पारंपारिक वेशभुषेमध्ये तयार होऊन पंडालमध्ये दर्शनासाठी जातात. नऊ दिवस पूजा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी बंगाली महिला सिंदूर खेळतात. सिंदूर खेला किंवा सिंदूर उत्सव नावाने देखील ओळखला जातो.गुजरातमध्ये गरबा रास :
गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात सर्वात जास्त गरबा महोत्सवचे आयोजन केले जाते. गरबा महोत्सवदरम्यान दुर्गा मातेची पूजा केली जाते. मातीच्या घटाला गरबाचे प्रतिक म्हणून वापरले जाते, ज्याच्या चौफेर फेर धरून गरबा खेळतात. हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे. गरबासोबतच नवरात्रीमध्ये गुजरातमध्ये दांडिया रासची पण खूप प्रसिध्द आहे. यावेळी गुजराती महिला-पुरुष जोडीने गरबा पंडालमध्ये गाण्यांच्या चालीवर गरबा नृत्य करतात. त्यामध्ये भाग घेण्यासाठी लोक विशेषत: खास तयारी करतात. एक महिना आधीपासून ट्रेनिंग देखील घेतात. गरबाची क्रेज आता देशभर पसरली आहे.
तामिलनाडूमध्ये बोमई गोलु :
तामिलनाडूमध्ये नवरात्रीमध्ये गोलु नावाचा सण साजरा केला जातो. नवरात्रीची सुरुवात होतात तामिलनाडूमध्ये पांरपारिक बाहुल्या दिसू लागतात. या बाहुल्या 7,9, 11 असा ऑड नंबरनी लावल्या जातात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना 100 छोट्या मोठ्या बाहुल्या मांडल्या जातात आणि त्याचीही पूजा केली जाते. या मुर्ता जेव्हा पंडालमध्ये ठेवल्या जातात तेव्हा ते दृश्य एखाद्या म्युझियमसारखे दिसतेय. येथील लोक देवीच्या तीन रुपांची पूजा करतात.
हिमाचल प्रदेशमधील नवरात्री कुल्लू :
हिमाचल प्रदेशमध्ये हिंदू नवरात्री उत्सव खूप भक्ती भावाने साजरा करतात. नवरात्री उत्सवाच्या दहाव्या दिवशी हिमाचलमधील कुल्लू दसरा साजरा केला जातो आणि प्रभु श्री राम यांच्या आयोध्येमध्ये परत येण्याचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. हिमाचल आणि भारतामध्ये अन्य राज्यांमध्ये लोक देवी दुर्गामातेची पूजा करण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातात. प्रसिध्द कुल्लू दसऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हिमाचलमध्ये नक्की जायला हवे. देवी-देवतांना यात्रा काढण्यासाठी बाहेर काढले जातात आणि पूजा पाठ करण्यासाठी किसी शुभ ठिकाणी आणले जाते. देशातील सुंदर यात्रांपैकी ही एक यात्रा असते, जी दरवर्षी खूप साऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात.
आंध्र प्रदेशमध्ये बथुकम्मा उत्सव :
आंध्रप्रदेशमध्ये 'बथुकम्मा पांडुगा' रुपामध्ये नवरात्री साजरा केली जाते. बथुकम्मा ला महागौरीचे रुप म्हणून पुजले जाते. बथुकम्मा देवीची मुर्ती फुलांपासून तयार केली जाते हा सण सर्वात महत्वपूर्ण आहेत पण आंध्र प्रदेशातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. जिथे पश्चिम आणि उत्तर राज्यांमध्ये या सणांमध्ये लोक धुमधडाक्यात साजरा करतात. तेच दक्षिण राज्यांमध्ये हा सण खूप साध्या पद्धतीनेसाजरा केला जातो. फुलांपासुन गोपुरम मंदिरांची प्रतिकती साकारली जाते. सोन्याचे दागिने आणि रेशम साडी नेसून महिला बथुकम्माच्या आसपास गौरी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात
उत्तर प्रदेश और उत्तराखंडमध्ये रामलीला आणि रावणदहन
उत्तर भारतामध्ये काही राज्यांमध्ये नवरात्रीच्या दरम्यान, देवी माताचे मुर्ती स्थापित केली जाते. या काळात विशेष आरती आणि पूजा केली जाते. तसेच कलाकाल रामलीला सादर करतात. ज्यामध्ये अयोध्यचे राजा प्रभु श्रीराम हे लंकेचा राजा रावण याचा वध करतात. नऊ दिवस रामलीला नाटिका सादर केल्यानंतर दसऱ्या दिवशी रावण, मघेनाद आणि कुंभकर्ण यांचे पुतळे उभारून जाळले जातात. या उत्सवाला असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.
कर्नाटक दसरा
कर्नाटकमधील मैसूर शहरातील दसरा पूर्ण देशामध्ये प्रसिध्द आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हत्तींना सोने-चांदीच्या दागिण्यांनी सजविले जाते आणि मैसूरच्या राजमहालाल विशेष लाईटिंग केले जाते.
केरळमधील नवरात्री :
केरळमध्ये नवरात्री उत्सव शेवटच्या तीन दिवसांमध्ये साजरा होतो. येथे लोक आपली पुस्तकं देवी सरस्वतीच्या चरणी अर्पन करुन ज्ञान आणि समृध्दीसाठी प्रार्थना करतात. येथील लोक या पंरपरेला खूप शूभ मानतात.
पंजाबमध्ये नवरात्री
पंजाबमध्ये नवरात्री वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथील लोक पहिले सात दिवस व्रत करतात, या काळात जागरण केले जाते. देवी दुर्गामातेचे पुजन करून आठव्या दिवशी भंडारा आणि नवव्या दिवशी महाप्रसाद आयोजित करतात. येथील लोक या दिवशी व्रत सोडतात. यावेळी मुलींना दान देतात आणि लाल ओढणी भेट दिली जाते.
महाराष्ट्रामध्ये नवरात्र :
महाराष्ट्रतील लोक नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये मातीमध्ये वेगवेगळे धान्य टाकून त्यामध्ये नऊ दिवस मातीचे घट कलश मांडून त्याची पूजा करतात.
गुजरात प्रमाणे महाराष्ट्रमध्येही नवरात्र उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये नवरात्रीमध्ये नवी गोष्टी करणे शुभ मानले जाते त्यामुळे या काळात लोक घरात काहींना खरेदी केली जाते. गुजरातमधील गरबा आणि दांडिया महाराष्ट्रात खूप प्रसिध्द आहे त्यामुळे महाराष्ट्रात गरबा आणि दांडिया नाईटचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रमध्ये पांरपरिक पद्धतीने भोंडला खेळला जातो. मध्यभागी हत्ती मूर्ती किंवा चित्र काढून फेर धरून गाणी गायली जातात. यालाच भुलाबाई किंवा हादगा म्हणूनही ओळखले जाते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.