मुंबई - कोरोनाचा मोठा फटक मनोरंजन क्षेत्राला बसला होता. मात्र तरीही या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ज्या मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झाले त्यांनी प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले. लॉकडाऊनमध्ये या ओटीटी माध्यमानं प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट आणि मालिकांची मेजवानी दिली. येत्या काळात थिएटर सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र तरीही सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर काही मर्यादा असणार आहे. हे लक्षात घेऊन काही ओटीटी प्लॅटफॉर्मनं मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना द्यायचं ठरवलं आहे. यात अॅमेझॉन आघाडीवर असणार आहे. त्यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या मालिका आणि चित्रपटांची माहिती दिली आहे. दिवाळीतही प्रेक्षकांना वेबसीरिज आणि मालिका यांचा फराळ मिळणार असल्याचे यानिमित्तानं दिसून आले आहे.
देव पटेल अभिनीत ‘द ग्रीन नाइट’, सर गवेन आणि द ग्रीन नाईटची गाथेचे रिटेलिंग असलेली मध्ययुगीन फॅंटसी घेऊन येत आहे.
याशिवाय शशिकुमार ज्योतिका आणि सूर्या अभिनीत मर्डर मिस्ट्रि ‘जय भीम’ कौटुंबिक पुनर्मिलनची कथा प्रदर्शित केली जाणार आहे.टीन हॉरर ड्रामा ‘आय नो व्हॉट यु डिड लास्ट समर’, व ‘मॅराडोना- ब्लेस्ड ड्रीम’ ऑल टाईम फेव्हरीट फूटबॉलपटू डिएगो अरमांडो मॅराडोनाच्या आयुष्यावर आधारित एक विशेष मालिका पाहता येणार आहे. हिट मल्याळम हॉरर चित्रपट - एज्राचा अधिकृत रीमेक असलेल्या इम्रान हाशमि स्टारर ‘डायबूक’ या भयपटाद्वारे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.
नर्व्ह-ब्रेकिंग थ्रिलरपासून दोन विलक्षण बायोपिक्सपर्यंत विनोदाचा एक मस्त डोस, एक चमकदार नाटक आणि काही विलक्षण आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, अशा वैविध्यपूर्ण आणि आकर्षक फेस्टिव्ह कार्यक्रमांचा संग्रह सादर केला जाणार आहे.भारतीय क्रांतिकारी सरदार उधम सिंह यांच्या वरील बहूप्रतिक्षित आणि विक्की कौशल याची मुख्य भुमिका असलेला ‘सरदार उधम’ या चरित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन ची मुख्य भुमिका असलेल्या ‘भ्रमम’ या भारतातील एक उत्कृष्ट मल्याळम थ्रिलरसह सुरुवात होणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओची अभिनव स्टॅंड-अप मालिका ‘वन माइक स्टॅंड’च्या दुस-या सिजनमध्ये आत्तापर्यंत न ऐकलेल्या गोष्टी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. तमिळ भाषेतील कार्यक्रमांमध्ये भर घालण्यासाठी ‘उदानपिराप्पे’ हा फॅमिलि ड्रामाही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना माहितीपटही पाहता येणार आहे. त्यात जागतिक संगीत स्टार जस्टिन बीबरच्या जीवनातील अंतर्गत गोष्टींवरील एक डॉक्युमेंट्री यांचा समावेश आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.