new year 2022 fashion style esakal
2021 हे वर्ष काही दिवसा संपणार आहे. तसेच या वर्षी फॅशनमध्ये बरेच बदल झाले. लॉकडाऊनमुळे (Lockdown) कॅज्युअल (casual) कपड्यांचा ट्रेंड अधिक दिसून आला. वर्क फ्रॉम होममध्ये (Work from home) लोकांची हिच पसंती राहिली. अशा परिस्थितीत 2022 मध्ये कोणता ट्रेंड (Trends) समोर येतो हे पाहावे लागेल.
2022 मध्ये लोकांना आरामदायक कपडे घालण्याची सवय लागली आहे. अशा परिस्थितीत लोक ऑफिसला जातील पण तिथेही कम्फंर्ट (Comfort) वाटणाऱ्या कपड्यांना प्राधान्य देतील. ज्यामध्ये वाइड लेग पॅन्ट, फ्लेर्ड तसेच बॉयफ्रेंड आणि मॉम जीन्ससह प्लाझो पॅंटचा ट्रेंड जबरदस्त असेल.मनीष मल्होत्राच्या पार्टी कलेक्शनमध्ये बहुतेक चमकदार आणि स्टार साड्या आणि लेहेंगा डिझाइन्स सतत दिसतात. अशा परिस्थितीत 2022 मध्येही शिमरी वर्कचे पार्टीवेअर आउटफिट्स (Partywear outfits) पाहायला मिळतील. त्याच वेळी, लोकांना यामध्ये सिल्व्हर, कॉपर आणि गोल्ड कलर्स अधिक आवडतील.वर्षानुवर्षे चालत आलेला स्किन टाईट जीन्सचा (Jeans) ट्रेंड आता बदलला आहे. आता बॉयफ्रेंड जीन्स (Boyfriend jeans) म्हणजेच लूज-फिटिंग जीन्स (Loose-fitting jeans) मुलींची पहिली पसंती बनली आहे. ऑफिसला जाण्यासाठीही स्ट्रिक्ट फॉर्मल्सची (Strict formals) जागा नार्मल कपड्यांनी घेतली आहे.यासोबतच लोक डार्क रंगांना प्राधान्य देऊ शकतात. येत्या वर्षात लोकांना अधिक कपडे आणि को-ऑर्डर सेटचे रंग आवडतील. दुसरीकडे, जर आपण पार्टीबद्दल बोललो, तर अॅक्सेसरीजमध्ये (Accessories) हलके ज्वेलरी ट्रेंडमध्ये असतील. 2021 मध्ये लॅक्मे फॅशन वीक दरम्यान, डिझायनर्सनी पेस्टल कलर (Pastel color) आणि कलर ब्लॉक प्रिंट्सची (Block prints) फॅशन दाखवली. त्याचबरोबर या वर्षी कलर ब्लॉक्ससोबत अॅनिमल प्रिंट्स (Animal prints) देखील ट्रेडिंगमध्ये असू शकतात. अशा स्थितीत डिझायनर्स कोणत्या प्रिंटला जास्त पसंती देतात हे पाहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.