ब्युटी इ-कॉमर्स कंपनी नायका आयपीओच्या जबरदस्त यशामुळे त्यांची प्रमोटर फाल्गुनी नायर यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. शेअर बाजारामध्ये नायकाची पॅरेंट कंपनी FSN E-Commerce Ventures Ltd कंपनीचे लिस्टिंग झाले आहे आणि त्यामुळे फाल्गुनी नायर आता मालामाल झाल्या आहेत. त्यांनी संपत्तीच्या क्रमवारीत बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ, हॅवेल्सचे अनिल राय गुप्ता अशा अनेक उद्योगपतींनाही मागे टाकले आहे.
फाल्गुनी नायर आणि त्यांचे कुटुंबाच्या ट्रस्टची नायकामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे. त्यांची सामूहिक संपत्तीमध्ये भर पडली असून जवळपास 54831 कोटी रुपयांवर पोहचली आहे. हा आयपीओ लॉन्च होण्यापूर्वी नायर आणि त्यांच्या कुटुंबींयाची संपत्ती 27962 कोटी रुपयांच्या आसपास होती. नायाकाचे प्रोमटर्स फाल्गुनी नायर यांचा फॅमिली ट्रस्ट त्यांचे पती संजय नायर यांचा फॅमिली ट्रस्ट, मुलगी आणि आई रश्मि मेहता यांचा ट्रस्ट देखील यामध्ये सामविष्ट आहे.
आयपीओनंतर आता नायर फॅमिली ट्रस्टची या कंपनीमध्ये 22.04 टक्के भागिदारी राहिली आहे. त्यांच्या पतीच्या ट्रस्टची 23.37 टक्के भागीदारी आहे. करीब 1,04,360.85 कोटी रुपये मार्केट कॅपिटल सोबत नायकाचा भारतातील टॉप 100 लिस्टेड कंपन्यांमध्ये समावेश झाला आहे.
फाल्गुनी नायर यांना आता Bloomberg Billionaires Index मध्ये स्थान मिळाले आहे. ही जागा आतपर्यंत भारतातील फक्त 6 महिलांना असे स्थान मिळाले आहे. Bloombergने त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिला उद्योजक असल्याचे सांगितले आहे. इनव्हेस्टमेंट बँकरचे आकर्षक करिअ सोडून फाल्गुनी नायर यांनी 2012 साली नायकाची सुरूवात केली. 1600 पेक्षा अधिक लोकांच्या टीमचे नेतृत्व करत फाल्गुनी यांनी एक ब्युटी आणि लाईफस्टाईल रिटेल एम्पायर नायकाची निर्मिती केली, जी आपल्या वैयक्तिक लेबल सोबत 1500 प्लस ब्रँडच्या पोर्टफोलियो सोबत भारताच्या अग्रेसर ब्युटी रिटेलरच्या स्वरुपात उभारी घेतली आहे. नायकाने पहिले फिजिकल स्टोर 2014 साली सुरु केले. 31 ऑगस्टमध्ये 2021 पर्यंत FSN ई-कॉमर्सने देशातील 40 शहरांमध्ये 80 फिजिकल स्टोर निर्माण केले. ब्युटी आणि पर्सनल केअर साठी नायका एक प्रायमरी अॅप आहे. त्याशिवाय नायका फॅशन देखील आहे, जिथे कपडे, असेसरीज, फॅशनसंबधीत प्रॉडक्ट्स आहेत. त्यासाठी एॅप्सवर रिटेल स्टोर्स 4000 पेक्षा जास्त ब्युटी आणि पर्सनल केअर आणि फॅशन ब्रँड्स संबधीत प्रॉडक्ट्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.