shri Vitthal Rukmini esakal
पंढरपूर (सोलापूर) : गुढी पाडवा नूतन वर्षारंभानिमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी आणि विविध प्रकारच्या फळांनी मनमोहक, नाविण्यपूर्ण सजावट करण्यात आली.
झेंडू, शेवंती, ऑरकेट, गुलाब अशा तब्बल दोन हजार किलो फुलांचा आणि अननस, डाळींब, कलिंगड, सफरचंद, संत्री अशा सुमारे 1100 किलो फळांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.विविध फळे आणि फुलांच्या मध्ये उभ्या असलेल्या विठूरायाच्या आणि रुखुमाईच्या दर्शनाने भाविक तृप्त होत आहेत. कोरोनाच्या भितीने तब्बल दोन वर्षे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते.आजपासून पुन्हा विठुरायाच्या चरणांना स्पर्श करुन आणि देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येऊ लागल्याने भाविकांमधून आनंद व्यक्त होत आहे.विविध सण आणि उत्सवाच्या काळात येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांचा वापर करुन अथवा त्या त्या काळात उपलब्ध असलेल्या फळांचा वापर करुन सजावट केली जाते. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचा आणि श्री रुक्मिणीमातेचा गाभारा तसेच मंदिराच्या अन्य भागात फुलांनी आणि फळांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे.विविध प्रकारच्या फळाफुलांच्या मध्ये उभी राहिलेल्या विठूमाऊलीचे आणि रुखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.(टाळगाव ) चिखली येथील श्री विठ्ठल भक्त नाना बबन मोरे आणि नवनाथ नामदेव मोरे यांनी सजावटीसाठी फुले उपलब्ध करुन दिली आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचारी आणि श्री साई डेकोरेटर्स (शिंदे ब्रदर्स ) यांनी ही फुलांची सजावट केली आहे.
पंढरपूर येथील मंदिरात भाविकांना पदस्पर्श दर्शऩ घेण्याची परंपरा होती. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता म्हणून गेल्या दोन वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पदस्पर्श दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली होती.आता शासनाने निर्बंध शिथील केले असल्याने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पदस्पर्श दर्शऩ सुरु करण्य़ात यावे अशी मागणी वारकरी भाविकांमधून होत होती. आज तब्बल दोन वर्षानंतर विठूरायाचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरु करण्यात आले.आज पहाटे दर्शनाच्या रांगेतून मंदिरात आलेल्या भाविकांवर पुष्पवर्षाव करुन भाविकांचे स्वागत करण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते.
आता तब्बल दोन वर्षानंतर विठूराच्या चरणांना स्पर्श करुन देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येऊ लागल्याने वारकरी भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.