पंढरपूर (सोलापूर): श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असताना देखील आज परिवर्तिनी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी येथे येऊन मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन समाधान मानले. परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.
कोरोनाच्या सावटामुळे यात्रा भरु शकलेल्या नाहीत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अजूनही भाविकांना प्रवेशास बंदी आहे. तथापी आज परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून शेकडो वारकरी भाविक पंढरपुरात आले होते. चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वीर धरणातून नदीत सोडण्यात आलेले पाणी येथे पोहोचलेले असल्याने चंद्रभागेची पाण्याची पातळी वाढली आहे. नदीत स्नान करुन श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे आणि संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भाविक समाधान मानत होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण उत्सव तसेच एकादशीच्यावेळी फुलांची मनमोहक सजावट करण्यात येते.त्यानुसार आज विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांनी सजावटीसाठी शेवंती, झेंडू, तगर, अष्टर, गुलाब अशी अनेक प्रकारची सुमारे सातशे किलो फुले आणि दुर्वा दिल्या होत्या.पंढरपूर येथील शिंदे ब्रदर्स, साई डेकोरेटर्स यांनी या फुलांच्या आणि दुर्वांच्या सहाय्याने मंदिरात मनमोहक सजावट केली होती. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सजावटीमध्ये काही ठिकाणी गणपती दाखविण्यात आलेले असून मोरया अशी अक्षरे ही त्यामध्ये रेखाटण्यात आली आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.