शाळेचा पहिला दिवस. नवी कपडे, नवी पुस्तके, नवे दप्तर, मोठ्या सुट्टी नंतर भेटणारे मित्र अशी नवलाई अनुभवण्याचा दिवस म्हणजे शाळेचा पहिला दिवस; पण समस्त मानव जातीच्या राशीला लागलेल्या 'कोरोना'ने विद्यार्थ्यांच्या जिवनातली नवलाई पुसून टाकली.
शाळेचा पहिला दिवस. नवी कपडे, नवी पुस्तके, नवे दप्तर, मोठ्या सुट्टी नंतर भेटणारे मित्र अशी नवलाई अनुभवण्याचा दिवस म्हणजे शाळेचा पहिला दिवस; पण समस्त मानव जातीच्या राशीला लागलेल्या 'कोरोना'ने विद्यार्थ्यांच्या जिवनातली नवलाई पुसून टाकली. सरस्वतीच्या प्रांगणात किलबिलाट झालाच नाही. चिमुकल्याच्या अस्तित्वाविना शाळा सुन्या सुन्या राहिल्या.नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू होत असून कोरोना काळामुळे शासनाने पूर्ण टाळेबंदी केली आहे. यात शाळासुध्दा सामिल आहेत. पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणारा अपशिंगे (मिलीटरी) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा शालेय परिसर मागील वर्षाप्रमाणे यंदासुध्दा सुना-सुना वाटत आहे.राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय वर्षाला आज सुरुवात झाली असून यासाठी शाळेमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे.कोरोनामुळे ऑनलाइन क्लासेस घेण्यास शिक्षकांनी सुरुवात केली असून विद्यार्थी घरीच राहुन आपला दैनंदिन अभ्यास करणार आहेत.ऑनलाइन शाळा आजपासून सुरु झाल्याने पालकांनी आज शाळेत हजेरी लावत आपल्या पाल्याचे नाव शाळेत नोंदवायला सुरुवात केली.गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद होत्या. मात्र, आज शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने शिक्षकांनी शाळेत हजेरी लावत ऑनलाइन शिक्षणाविषयी आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करत दैनंदिन अभ्यासक्रमाबद्दल एकमेकांकडून माहिती जाणून घेतली.कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून विद्यार्थ्यांनी घरीच राहुन ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतले. असाच एक बालचमू आपल्या लॅपटाॅपवरती ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेताना टिपलेले हे सुंदर छायाचित्र..सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.