Snooker Player Ahsan Ramzan esakal
अहसाननं गतविजेत्या मोहम्मद आसिफचा उपांत्य फेरीत पराभव केला होता.
पाकिस्तानच्या अहसान रमजाननं (Snooker Player Ahsan Ramzan) IBSF जागतिक स्नूकर चॅम्पियनशिपचं (World Snooker Championship) विजेतेपद पटकावलंय. कतारची राजधानी दोहा येथे शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीत त्यानं इराणच्या अमीर सरकोशचा (Amir Sarkhosh) 6-5 असा पराभव केलाय.तत्पूर्वी, अहसान रमजाननं आणखी एका पाकिस्तानी (Pakistan) खेळाडू आणि गतविजेत्या मोहम्मद आसिफचा 5-4 असा रोमहर्षक उपांत्य फेरीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.मोहम्मद आसिफनं (Mohammad Asif) उपांत्यपूर्व फेरीत भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवाणीचा (Pankaj Advani) पराभव केला होता. आसिफनं तो सामना 4-2 नं जिंकला.16, 17 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील विजेतेपद जिंकणाऱ्या अहसान रमजानला श्रीलंका (Sri Lanka) आणि रशियन खेळाडूंसह 'गट-क'मध्ये स्थान देण्यात आलंय. या सर्व खेळाडूंना त्यानं प्रथम पराभूत केलं होतं.अहसाननं आठवी इयत्तेत शिक्षण सोडलं होतं. तीन वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर, तो व्यावसायिक स्नूकरकडं वळला. इतकंच नाही तर अहसान रमजाननं वयाच्या चौथ्या वर्षी आईलाही गमावलं होतं.IBSF वर्ल्ड चॅम्पियनशिप संपल्यानंतर आता दक्षिण आशियाई देशातील स्नूकर खेळाडू 37 व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहेत. ही चॅम्पियनशिप 12 मार्चपासून सुरू होत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.