Aishwarya Rai Bachchan ESakal
पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव समोर आलं होतं. त्यामुळे आज ईडीच्या कार्यालयात ऐश्वर्या पोहोचली .2016 मध्ये पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीची कागदपत्रं समोर आली होती. यामध्ये जगातील मोठे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावं उघड झाली.भारतातील जवळपास 500 जणांची नावं त्या यादीमध्ये होती. यामध्ये बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे 1993 ते 1997 या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. ऐश्वर्याला एका कंपनीची संचालिका बनवण्यात आलं होतं. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आलं. ऐश्वर्यासह तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत भागीदार होते.
कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होतं. त्याचं मुख्यालय व्हर्जिन आयलँडवर होतं.
या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक असून, त्यातील काही कंपन्यामध्ये ऐश्वर्याचेही नाव आले आहे.
अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यानं काही कागदपत्र ईडीला दिली होती. महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव या पनामा प्रकरणात आले होते.
अमिताभ बच्चन यांनी माझा अशा कोणत्याही कंपन्यांशी संबंध नसून, मी या कंपन्यांचा संचालक नाही. मी परदेशात खर्च केलेल्या पैशांवरील सर्व कर भरलेला आहे. याशिवाय मी परदेशात पाठविलेले पैसे भारतीय कायद्याला धरून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.Aishwarya Rai Bachchanसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.