काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा बहुतांश भागावर ताबा मिळवला असेल, पण एक प्रांत अजूनही आवाक्याबाहेर आहे आणि त्याचा सामना करण्यास तयार आहे. पंजशीर प्रांत काबूलपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे. पंजशीर म्हणजे 'फारस के पांच शेर'. आतापर्यंत कोणीही पंजशीर प्रांतावर ताबा मिळवू शकला नाही आणि तो बराच काळ स्वतंत्र क्षेत्र राहिला आहे.
पंजशीर प्रांतचा घाटी परिसर पाहण्यासाठी अतिशय आकर्षक आहे. हा अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांपैकी एक आहे.ज्यामध्ये 7 जिल्हे आहेत, ज्यात 512 गावे आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार, पंजशीरची लोकसंख्या 1,73,000 च्या जवळ आहे. त्याची प्रांतीय राजधानी बाजारक आहे.अमरुल्ला सालेह (अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती) या प्रांतातच आहेत.येथून त्यांनी असा दावा केला की, ते अशरफ गनी यांच्या सुटकेनंतर अफगाणिस्तानचे केयर टेकर प्रेसिडेंट आहे. त्यांनी तालिबानपुढे झुकणार नसल्याचेही यापूर्वी म्हटले होते.अमरुल्ला सालेहचे काही फोटो इंटरनेटवर सध्या फिरत आहेत. यामध्ये तो अहमद मसूदसोबत दिसत आहे. तो तालिबानी बंडखोर नेता (विद्रोही लीडर) अहमद शाह मसूदचा मुलगा आहे. असा दावा केला जात आहे की मसूदच्या हाकेवर अफगाण दलाचे सैनिक पंजशीरमध्ये एकत्र होत आहेत. अहमद शाह मसूदची 9/11 च्या हल्ल्यापूर्वी अल कायदा आणि तालिबानने हत्या केली होती.येथूनच उत्तर आघाडी तयार केली जात आहे, जी तालिबानविरोधी मोर्चा होईल. पंजशीरमध्ये उत्तर आघाडीचा झेंडाही फडकताना पाहिला आहे. उत्तर आघाडी एक लष्करी मोर्चा (मिलिट्री फ्रंट)आहे जी 1996 मध्ये स्थापन झालीय.तालिबानच्या विरोधात लढलेल्या या मोर्चाला इराण, भारत, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानचाही पाठिंबा मिळाला. 1996 ते 2001 दरम्यान तालिबान या मोर्चामुळे संपूर्ण अफगाणिस्तानावर ताबा मिळवू शकला नाही.यावेळी पंजशीरसाठी तालिबानचा लढा इतका सोपा होणार नाही, कारण तालिबानने आजूबाजूचे सर्व क्षेत्रावर ताबा मिळवला आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनून परतला आहे. एवढेच नाही तर त्याच्या दहशतवाद्यांकडे एकापेक्षा जास्त आधुनिक शस्त्रे आहेत.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.