Parenting Tips: ‘मुलं ही देवाघरची फुलं’ असे म्हणतात ते उगीच नाही. ज्याप्रमाणे सुंदर आणि सुगंधित फुलांचे सर्वांना आकर्षण असते, त्याचप्रमाणे सदाचारी आणि सद्गुणी मुलं सर्वांना आवडतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की त्यांचे मुलं लाखात एक असावे. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच मुलांना शिस्त (Discipline) लावणे गरजेचे असते. मात्र, पालकांसाठी ही तारेवरची कसरत असते. हेच कठीण काम सोपं करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देत आहोत. मुलांकडून नियमीत ते करवून घेतल्यास नक्कीच ते सर्वांसाठी आदर्श ठरतील.
1. मदतीची प्रवृत्ती- एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। संत तुकाराम महाराजांच्या या सुंदर वचनाप्रमाणे आवश्यक तिथे गरजूंना मदत करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करीत राहावे. मदत करणारे मुलं सर्वांना प्रिय असतात. मदतीची सवय लावण्याची सुरुवात प्रथम घरातूनच करावी. कुटुंबातील व्यक्तींची लहानसहान कामात मदत करण्यासाठी मुलांना प्रेरित करावे. त्यामुळे इतर लोकांना साहाय्य करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये वाढते.
2. कृतज्ञता बाळगणे- प्लीज, थँक्यू आणि वेलकम हे तीन शब्द मुलांना नक्की वापरणे शिकवा. वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या मुलांना समाजात आदर मिळतो. ते लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरतात. मुलांसोबत बोलताना तुम्ही सुद्धा या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे मुलं सुद्धा या शब्दांचा उपयोग करू लागतात.
3. प्रामाणिक वागणे- प्रामाणिक मुलं सर्वांसाठी रोल मॉडेल असतात. मुलांना नेहमी खोटं बोलणे आणि वाईट सवयींपासून दूर ठेवा. मुलं कुटुंबातील व्यक्तीचे अनुकरण करतात. म्हणून मुलांसमोर तुम्ही सुद्धा प्रामाणिक वागले पाहिजे. कोणतीही परिस्थिती असली तरी मुलांना सत्य बोलण्यास प्रवृत्त करा.
4. एकत्र जेवण करा- धकाधकीच्या जीवनात कुटुंबासोत वेळ घालविण्याची फुरसत आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या समस्या ऐकून घेता येत नाही. एकत्र जेवायला बसल्यामुळे कुटुंबातील लोकांना तेवढा वेळ तरी देता येतो. उलट विविध विषयांवर चर्चा होतात. त्याचा सकारात्मक प्रभाव मुलांवर पडतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणाचे नियोजन हे एकत्र करण्याचे असावे.
5. सेव्हिंग्सची सवय- मुलांना नेहमी पैशाचे महत्त्व समजवावे. त्यांना मिळणाऱ्या पॉकेट मनीचे नियोजन करण्याची सवय लावावी. गरज असेल तेव्हाच पैशांचा उपयोग करण्याचे धडे त्यांना द्यावेत. सेव्हिंग्ज केल्याने भविष्यात मिळणारा मोबदला त्यांना समजावून सांगावा. जेणेकरून मोठे झाल्यावर पैशाचा सांभाळून वापर करण्याची सवय मुलांना लागेल. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.