मुलांचे संगोपन व्यवस्थित केले नाही तर त्याचा त्यांच्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. मुलांचे योग्य संगोपन न झाल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि शारीरिक विकासावरही परिणाम होतो. काही पालक असेही आहेत जे एकटेच मुलांचे संगोपन करतात. सिंगल मदर किंवा सिंगल फादर या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाचे संगोपन करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
अनेक वेळा सिंगल फादर्स आपल्या मुलांच्या संगोपनात काही चुका करतात, ज्यामुळे मुलांना त्रास सहन करावा लागतो. यासोबतच पालकांना चुकीची पावले उचलणे किंवा पालकत्व करताना जास्त ताण घेतल्याने समस्यांना सामोरे जावे लागते. एकट्या वडिलांसाठी पालकत्वाच्या महत्त्वाच्या टिप्सबद्द्ल जाणून घेऊया.आजच्या काळात असे अनेक वडील आहेत जे आपल्या मुलांना सिंगल फादर्स म्हणून वाढवतात. अशा परिस्थितीत एकट्याने सर्व काही सांभाळणे त्यांच्यासाठी खूप अवघड असते. जबाबदारी घेत असताना आणि मुलाची काळजी घेत असताना, एकटेपणा आणि असहाय्य वाटल्यानंतर पालक अडचणीत येतात. सिंगल फादर म्हणून मुलांचे संगोपन करणाऱ्या नोकरदार लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. चिंतेचे, तणावाचे आणि मुलांच्या काळजीने जीवन हाताळताना अनेक अडचणी येतात, परंतु काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही त्या सर्वांवर मात करू शकता. सिंगल फादर्स' म्हणून पालकत्व घेत असताना, स्वतःची आणि तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. 'सिंगल फादर्स' या नात्याने तुम्ही मुलांची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य आणि मित्रांची मदत घ्यावी. याशिवाय, संगोपन करताना काही गोष्टींचे नियोजन केले पाहिजे. रोजचा दिनक्रम (Time Table) करा. दररोज तुमच्या कामाची पद्धतशीर Time Table तयार केल्याने तुमच्यासाठी काम करणे आणि मुलांचे संगोपन करणे सोपे होईल. तुमचे काम आणि घरातील कामांचे वेळापत्रक तयार करा. असे केल्याने तुम्ही मुलांना पुरेसा वेळ देऊ शकाल.तणाव आणि नैराश्य (डिप्रेशन) टाळण्यासाठी दररोज ध्यान (मेडिटेशन) आणि व्यायाम (एस्करसाइज) करा. तुमच्या पालनपोषणादरम्यान तुम्हाला नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. इतर पालकांशी स्वतःची तुलना अजिबात करू नका. असे केल्याने तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी बसू शकतात, ज्याचा परिणाम मुलांवरही होऊ शकतो.पालक आणि मूल यांच्यातील संवादाचा मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. जर तुमचे मूल आनंदी, अॅक्टिव्ह असेल तर याचा अर्थ तुम्ही योग्य ती काळजी घेत आहात, परंतु जर मूल सतत रडत असेल किंवा जास्तच रागावत असेल तर तुम्ही तुमच्या घरातील वातावरण कसे आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की, ज्या घरात आई-वडिलांमध्ये भांडणे होतात, त्या घरात मुले भीतीच्या सावटात राहतात आणि हळूहळू नैराश्याला बळी पडतात. हे टाळण्यासाठी तुम्ही परस्परातील भांडणे मुलांपासून दूर ठेवावीत. घटस्फोट झाला असेल आणि मुल वडिलांकडे असेल तर त्याला त्याच्या आईशी बोलू दयायला हवे. वडिल म्हणून तुम्ही त्याच्या संगोपनात जो निर्णय घ्याल तो ठाम असला पाहिजे. आपल्या परिस्थितीची कल्पना शाळेतल्या शिक्षकांना दिली तर त्या अशावेळी मदत करतात.
जर अपत्य मुलगी असेल तर तिच्याबरोबर कसे वागावे हे बरेचदा उमजत नाही. अशावेळी आईची भूमिका पार पाडावी लागते. तेव्हा बहिणीशी, आईशी संवाद साधून हे प्रश्न मिटवता येऊ शकतात. यासाठी घरच्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.