children watching TV esakal
खूप जास्त टीव्ही (TV) पाहणं हे मुलांच्या आरोग्याला घातक ठरतं, हे सर्वांनाच माहितेय. पण अनेक पालक आपल्या मुलांना टीव्हीपासून दूर ठेवू शकत नाहीत. तर दुसरीकडे कोरोना (Corona) काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या लाइफस्टाइलवरही (Lifestyle) मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या काळात वर्क फ्रॉम होमपासून ते ऑनलाइन क्लासेसपर्यंत अनेक नवीनवीन गोष्टी घडताना दिसताहेत. ज्याचा थेट परिणाम मुलांवरही मोठ्या प्रमाणात जाणवला आहे.
आता बहुतांश मुले बाहेर खेळायला जाण्याऐवजी घरी टीव्ही आणि व्हिडिओ गेम खेळण्यात वेळ घालवू लागली आहेत. अशावेळी टीव्ही बघताना मुलांना काही कॉमन गोष्टी सांगणं खूप महत्त्वाचं ठरतं. टीव्ही बघण्याच्या योग्य पद्धतीची ओळख पालकांनी मुलांना करून देणं खूप गरजेचं आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्यापासून बचाव होऊ शकतो. टीव्ही पाहताना मुलांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.
जर तुमच्या मुलांना टीव्हीची खूप आवड असेल आणि तो सतत टीव्हीसमोर बसून कित्येक तास घालवत असतील. त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर तसेच डोळे आणि मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सतत तासभर टीव्ही पाहिल्यानंतर त्याला गॅप देण्याचा प्रयत्न करा आणि थोड्या वेळासाठी दुसऱ्या कुठल्यातरी कामात गुंतून ठेवा. जेणेकरून मुलाला थोडा वेळ टीव्हीतून ब्रेक मिळू शकेल.टीव्हीच्या स्क्रीनपासून दूर ठेवा:
मुलांनी टीव्हीच्या स्क्रीनजवळच बसून टीव्ही पाहिला तर त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होऊ शकतो. ज्यातून कोरड्या डोळ्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे टीव्ही बघताना मुलांना दूर बसायला सांगा.मुलांना खुर्चीवर बसवा :
अनेक वेळा बेडवर पडून किंवा चुकीच्या स्थितीत बसून टीव्ही पाहिल्याने मुलांना पाठदुखी, मान आणि खांदेदुखीचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे मुलांना थेट खुर्चीवर बसून टीव्ही पाहण्याचा सल्ला द्या.
लाइटिंगची विशेष काळजी घ्या:
टीव्हीचे दुष्परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होऊ नयेत म्हणून खोलीतील दिव्यांची विशेष काळजी घ्यायला विसरू नका. लक्षात ठेवा की मुले खोलीतील दिवे बंद करून किंवा प्रखर दिव्यांमध्ये टीव्ही पाहत नाहीत. त्याचबरोबर मुलांना जेवण करताना टीव्ही पाहू नये यासाठी सल्ला द्या.उशी वापरा:
जर तुमचे मूल बराच वेळ टीव्ही पाहत असेल तर साहजिकच एकाच स्थितीत बसून राहिल्याने पाठदुखीची शक्यता वाढते. त्यामुळे कंबरदुखी टाळण्यासाठी टीव्ही पाहताना मुलांच्या पाठीमागे उशी किंवा टॉवेल लावा. तसेच, दर एका तासाला विश्रांती घ्या आणि शारीरिक अॅक्टिव्हिटी करण्यास सांगा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.