फोटोग्राफी

गीर, खिलार ते साहिवाल; जाणून घ्या भारतीय गोवंशाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
वैशिष्ट्ये : दुधाळ गोवंश, दुधातील स्निग्धांश ४ ते ६.५ पर्यंत, बैलांची उन्हामध्ये काम करण्याची क्षमता उत्तम. रंग संपूर्णपणे लाल, काळसर तांबडा, तांबड्यावर पांढरे ठिपके. मस्तक रुंद, शिंगे पूर्णत: काळी, कान पूर्णपणे लांबट व नाकपुडीपर्यंत येणारे, नाकपुडी लहान व काळी, भव्य वशिंड, मोठी कास, दुधाची शीर मोठी व नागमोडी.
वैशिष्ट्ये : बैल भातशेती व ओढकामासाठी प्रसिद्ध. गाय प्रतिदिन सहा ते सात लिटर दूध देते. दुधातील स्निग्धांश ३ ते ५ पर्यंत. गायींमध्ये रंग पांढरा, बैलांमध्ये मस्तक व शिंगाजवळ रंग गडद करडा. शिंगे लहान व मागून पुढे येणारी. कास मोठी झोळदार व दुधाची शीर स्पष्ट व नागमोडी असते. वशिंड घट्ट व भरदार असते.
वैशिष्ट्ये : दुधाळ गोवंश, दूध देण्यात सातत्य, दुधातील स्निग्धांश ३.३ ते ३.५ पर्यंत. रंग फिका लाल/तांबूस पिवळा, कपाळमाथा लांबट व अरुंद, शिंगे लहान, काळसर, डोळे लहान, कान लांबट चपटे, वशिंड मध्यम आकाराचे, कास गोलाकार आटोपशीर व सड लालसर, कातडी सैल, लोंबती नाभी , मान थोडी आखूड.
वैशिष्ट्ये : गोवंशाचे दूध औषधमूल्याच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्‍त. दुधामधील स्निग्धांश ४.५ ते ६ पर्यंत. बैल लहान व दणकट. गायी उंचीला कमी व लांबट. चेहरा अरुंद असतो. शिंगे लहान व खालच्या बाजूस झुकलेली. कास लहान, दुधाची शीर सरळ व स्पष्ट असते. चारही सड लहान आणि अगदी जवळ असतात.
वैशिष्ट्ये : प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्तम दूध देणारा गोवंश. दुधातील स्निग्धांश ३.५ ते ५.५ पर्यंत. बैल शेतीकामासाठी उपयुक्‍त. रंग पांढरा ते संपूर्ण करडा, मस्तक लांब व रुंद, शिंगे अतिशय लहान व गोलाकार, डोळे पूर्णत: काळे, कान लांब व अरुंद. वशिंड मध्यम परंतु भरगच्च. भरीव कास, चारही सड लांबट व गुलाबी, दुधाची शीर ठसठशीत.
वैशिष्ट्ये : दुधामध्ये औषधीमूल्य, स्निग्धांशाचे प्रमाण ६ ते ८ पर्यंत. लहान शरीरबांधा असूनदेखील गाय तीन ते पाच लिटरपर्यंत दूध देते. कमी आहारामध्ये जास्त दूध देण्याची क्षमता. विषम हवामान व कोरड्या वैरणीवर तग धरणारा गोवंश. उंचीला लहान पण लांबट आकाराचा गोवंश, रंग पूर्णपणे पांढरा, बैलांमध्ये वशिंड व मानेभोवती गडद काळसर छटा, कान लहान पण लांबट, शिंगे सरळ किंवा कोचर, कास लहान, चारही सड गुलाबी.
वैशिष्ट्ये : अत्यंत दुधाळ गोवंश, दुधामधील सातत्य व सलगता. दुधामधील स्निग्धांश ३ ते ५ पर्यंत. रंग संपूर्णपणे फिका तांबूस, काळा किंवा पांढरा, शिंगे अत्यंत लहान व काळी. वशिंड लहान व काळसर छटा. कास मोठी व दुधाची शीर मोठी व नागमोडी. चारही सड समान उंचीचे असतात.
वैशिष्ट्ये : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्यरत असणारा गोवंश. गाय निकृष्ट आहारावर सहा ते सात लिटर दूध देते. दुधातील स्निग्धांश ३.५ ते ६ पर्यंत. दूध देण्यात सलगता. रंग संपूर्णपणे करडा, मस्तक रुंद, शिंगे मोठी व डौलदार, डोळे लहानसर व काळे, कान मध्यम आकाराचे, भव्य वशिंड, कास मोठी व चारही सड समान उंचीचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: जळगावमधील उमेदवार गिरीश महाजन यांनीही केलं मतदान

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Adani Group: अदानी समूह देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर; मुंबईत उभारणार सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर

Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

गोड पण गूढ पण! प्रसाद ओक, स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वेच्या '‘जिलबी’चा पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येतेय भेटीला

SCROLL FOR NEXT