ख्रिसमसच्या दरम्यान अनेक घरांमध्ये रम, वाईन हे मद्य प्यायले जाते. तर नवीन वर्षाच्या पार्टीसाठी (Party) अनेक जण मद्य पिणे पसंत करतात. पण मद्य पिताना सगळेच जो दिसेल ते ग्लास किंवा कुठचाही ग्लास वापरतात. पण जेव्हा तुम्ही पार्टी करता तेव्हा त्या त्या मद्याला शोभेल असे ग्लास (Liquor Glass) वापरले तर योग्य ठरते. प्रत्येक मद्यासाठी वेगळे ग्लास असतात. मद्य कसे आहे यावरून त्याची रचना केलेली असते. तुम्ही जर ख्रिसमस किंवा नवीन वर्षाची पार्टी करणार असाल तर या ग्लासांविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
वाईन ग्लास (Wine Glass)
वाईन साधारण गोल आणि मोठ्या ग्लासात दिली जाते. त्यामुळे वाईनला ऑक्सिजन मिळतो, शिवाय नितळ चव मिळते. काचेच्या मोठ्या पृष्ठभागामुळे पेय हवेच्या अधिक संपर्कात येऊ शकते, वाईन तयार झाली की एक-दोन वर्ष साठवून ठेवली जाते. त्यात चॉकलेट, लिंबूवर्गीय फळे आणि मसाल्यांचे सर्व स्वाद वाईनमध्ये अतिशय छान पद्धतीने उतरतात. लाल वाइन ग्लासेस लांब दांड्यासह डिझाइन केलेले आहेत, जे हातांच्या उष्णतेमुळे वाईन उबदार होण्यापासून वाचविते. शॅंपेन ग्लास (Champagne Glass) -फ्रेंच शॅम्पेन ते इटालियन फ्रान्सियाकोर्टा नेहमी ट्यूलिप ग्लासमध्ये दिले जाते.. शॅम्पेन ग्लासेस हे साधारणपणे लहान-ते-मध्यम आकाराचे स्टेम्ड ट्यूलिप ग्लास असतात. त्यात लांब, अरुंद, सरळ गॉब्लेट असते. ट्यूलिप ग्लास पुरेसे उंच असतात कारण त्यातून कार्बोनेशन प्रक्रिया कपता येते. हे ट्यूलिप ग्लास वायुवीजन (aeration) राखण्यास मदत करतात. व्हिस्की ग्लास (Whisky Glass) - कॉम्पॅक्ट ग्लेनकेर्नपासून ते एक्स्ट्रावेगंट स्निफ्टरपर्यंत व्हिस्कीसाठीही वाईनप्रमाणे वेगवेगळे ग्लास असतात. अँटिक लोबॉल ग्लास किंवा व्हिस्की टंबलर ग्लासचा बेस हा खालून जाड असतो. त्यात . व्हिस्की नीट किंवा 7 ते 12 औंसमध्ये व्हिस्की कॉकटेल देतात. जर थोड्या प्रमाणात प्यायचे असेल तर त्यासाठी शॉर्ट ग्लास दिले जातात. व्हिस्कीच्या डबल शॉटसाठी शूटर ग्लासला प्राधान्य दिले जाते. मार्टीनी ग्लास (Martini Glass) - मार्टीनी पूर्वी कॉकटेल ग्लासमधून दिली जात होती. पण आता मार्टीनी बरोबर व्होडका बेस असल्याने ग्लासचा आकार वाढला. मार्टिनी ग्लास तळाला शंकूच्या आकाराचा अ सतो तर वरच्या भागाता मोठा आकार होतो. ते आयकॉनिक व्ही आकाराचे ग्लास असून त्याला पातळ स्टेम आणि रूंद रिम असते. त्रिकोणी आकाराच्या या ग्लासातून मद्याचे बुडबडे जलद सोडले जातात. कॉकटेल ग्लास (Cocktail Glass) -क्लासिक, ट्रेडिशनल कॉकटेल ग्लास हा उलटा शंकूच्या आकाराचा असून त्याचे विविध आकार असतात. साधारणपणे 3 ते 6 औंस. हे बर्फाशिवाय कॉकटेल सर्व्ह करण्यासाठी वापरले जाते. तसेच मद्याची चव आणि सुगंध त्यात योग्य उतरतो. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.