IPL 2021 in Dubai: स्पर्धेचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतून काही महागड्या आणि अनुभवी खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे त्या-त्या संघांना त्यांच्या अनुपस्थितीचा फटका बसणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
रायली मेरेडिथ (पंजाब किंग्स) - रायलीने युएईमध्ये होणाऱ्या IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. पंजाबने आपला चमू जाहीर करण्याच्या एक दिवस आधी त्याने व्यवस्थापनाला तशी कल्पना दिली. त्याच्या जागी पंजाबने नॅथन एलिसला संघात स्थान दिले आहे.अँडम झम्पा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - अनुभवी ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँडम झम्पा IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाही. आपण खेळण्यास उपलब्ध नसल्याचे त्याने कळवले आहे. IPL 2021च्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यांतही त्याला संधी मिळालेली नव्हती. झम्पाच्या जागी संघात श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा याला संधी मिळाली आहे.झाय रिचर्डसन (पंजाब किंग्स) - पंजाबच्या संघाने तब्बल १६ कोटी रूपये मोजून संघात स्थान दिलेला झाय रिचर्डसन स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रिचर्डसनने पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यात ३ सामन्यात ३ बळी मिळवले होते.जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) - राजस्थान संघाचा हुकूमी एक्का जोस बटलर याने IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. त्याची पत्नी गरोदर आहे. अशा परिस्थितीत तिची काळजी घेण्यासाठी तो तिच्यासोबत असावा या भावनेने त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.पॅट कमिन्स (कोलकाता नाईट रायडर्स) - कमिन्सचे कारणदेखील बटलरसारखंच आहे. कमिन्सची पत्नी गरोदर आहे. त्यामुळे तो तिच्यासोबत ऑस्ट्रेलियात थांबणार आहे. सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे कमिन्स ऑक्टोबरच्या अखेरीस होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून खेळणार आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.