Bihar Police Force esakal
बिहार विशेष सशस्त्र पोलिसातून निवडलेल्या या 92 महिला सैनिकांनी कमांडो प्रशिक्षणादरम्यान गेल्या तीन महिन्यांत प्रत्येक आव्हानांचा सामना केलाय.
बिहारच्या पोलीस दलात (Bihar Police Force) आता महिला कमांडोंचा सहभाग झाल्याने दल एकदम भक्कम झालंय. नुकतेच, बीएमपीमधून (BMP) निवड झालेल्या काही महिलांनी महाराष्ट्रात जावून कमांडो प्रशिक्षण घेतलं असून त्या महिला कमांडो प्रशिक्षणानंतर आता पुन्हा आपल्या मायदेशी म्हणजेच, बिहारला परतल्या आहेत. लवकरच या महिला कमांडो बिहार पोलीस दलात दाखल होतील. बिहार पोलीस आलोक राज यांनी सांगितलं, की प्रशिक्षण पूर्ण करून बिहारला परतलेल्या महिला कमांडोंना रजेवर पाठवण्यात आलं होतं, त्यामुळे रजेवरुन परत येताच, त्या 92 महिला कमांडोंना लवकरच विशेष एजन्सीत दाखल केलं जाईल. जिथं फक्त निवडक पोलिसांनाच संधी दिली जाते. यात सर्व महिला कमांडो आपली ताकद दाखवतील आणि SSG, ATS आणि STF मध्ये योगदान देतील.यापैकी काही महिला कमांडो स्पेशल सिक्युरिटी ग्रुपमध्ये (SSG) योगदान देतील. तर, एसएसजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा सांभाळते, म्हणून येथे फक्त चोख पोलीस अधिकारी आणि जवान तैनात असतील. याशिवाय, दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी काही महिला कमांडोच्या चमूंना विशेषतः तयार केलेल्या ATS मध्ये समाविष्ट केलं जाईल.उर्वरित महिला कमांडो बिहार पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स म्हणजेच, एसटीएफचा STF भाग असतील. या सर्व महिला कमांडोंना महाराष्ट्रातील मुतखेड येथे सीआरपीएफच्या CRPF कोब्रा युनिटच्या (CRPF Cobra Unit) देखरेखीखाली प्रशिक्षण देण्यात आलंय.बिहार विशेष सशस्त्र पोलिसातून निवडलेल्या या 92 महिला सैनिकांनी कमांडो प्रशिक्षणादरम्यान गेल्या तीन महिन्यांत प्रत्येक आव्हानांचा सामना केलाय. सर्वात मोठे हल्ले अयशस्वी करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच या महिलांना लहान आणि अत्याधुनिक शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आलंय.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.