Payal Rohatgi-Sangram Singh Wedding- Mehendi,Sangeet Ceremony Photo Instagram
संगीत सोहळ्यासाठी पायलनं ऑल-व्हाइट आऊटफिट घातला होता. यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. संग्राम आणि पायलच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे हे फोट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
लॉकअप फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंगने १२ वर्षाच्या रिलेशनशीनंतर आता लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाआधी त्यांच्या संगीत आणि मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
मेहेंदी सोहळ्याला पायल रोहतगीनं मल्टी कलरचा लेहेंगा घातला होता जो तिच्यावर खूपच खुलून दिसत होता. तर संग्राम सिंगने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. मेहेंदीतील फोटोत दोघे एकमेकांसोबत खूश दिसत आहेत.मेहेंदीच्या सोहळ्यासाठी पायलने खूप साधा लूक ठेवला होता. तिनं हेवी मेकअप किंवा ज्वेलरी परिधान केलेली दिसली नाही. फुलांचा मात्र तिनं छान पद्धतीनं वापर केलेला दिसला.
पायल-संग्रामचा संगीत सोहळा एकदम धामधूमीत पार पडला. डोक्यावर लाल चुनरी,माथ्यावर लाल बिंदी लावून बसलेल्या पायलला पाहिल्यावर नक्कीच पाहत रहावसं वाटेल.पायलच्या हातावरच्या मेहेंदीचा रंग गडद झालेला दिसून आला. आता यावरनं एवढं तर लक्षात येतं की १२ वर्षांच्या प्रेमाचा हा रंग चढलेला आहे. मेहेंदी सोहळ्या दरम्यान पायल रोहतगीच्या चेहऱ्यावर लग्नाचं तेज उठून दिसत आहे. तर संग्राम सिंग देखील तिच्याजवळ बसून सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करताना दिसत आहे. मेहेंदीच्या फोटोत पायलचा हसरा चेहरा पाहून तिचे चाहते मात्र भलतेच खूश झाले असणार हे नक्की.पायल-संग्रामने संगीत सोहळ्यात खूप धमाल-मस्ती केली. दोघांनी डान्सचा आनंदही घेतला. डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. आज ९ जुलै रोजी पायल-संग्राम लग्नबंधनात अडकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.