Perfume Day esakal
फोटोग्राफी

Perfume Day : दीपिका ते सुष्मिता, बॉलीवूड अभिनेत्री वापरतात 'हा' महागडा परफ्युम ब्रँड

चला तर आज आपण परफ्युम आणि त्यांच्या ब्रांडविषयी थोडक्यात जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

अनेकांना परफ्युम किंवा अत्तर लावण्याची विशेष आवड असते. यात सुद्धा काही जण ठराविक सुवासाचं किंवा ब्रँडचंच परफ्युम वापरतात. बॉलीवूड सेलिब्रिटींचा या बाबतीत थाटच काहीसा वेगळा आहे. तुम्हाला माहितीये का दीपिका, सुष्मिता सेन यांसारख्या बड्या अभिनेत्रींना कोणता परफ्युन आवडतो ते. चला तर आज आपण परफ्युम आणि त्यांच्या ब्रांडविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

Deepika Padukone’s Estée Lauder Perfume - दीपिका पदुकोणच्या परफ्युमचा सुगंध खूप छान आहे. आपल्यापैकी बरेच जण तिच्या परफ्युमची चॉइस जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ती ह्यूगो बॉस, एस्टी लॉडर आणि राल्फ लॉरेन या ब्रँडमधील परफ्यूम वापरण्यास प्राधान्य देते. एस्टी लॉडरचे मॉडर्न म्युझ हे तिच्या आवडत्या परफ्युमपैकी एक आहे. याची किंमत 100ml साठी अंदाजे 9,000 रुपये आहे.
Priyanka Chopra Jonas’ Trussardi Donna Perfume - ग्लोबल आयकॉन, प्रियांका चोप्रा जोनास तिचा आवडता 'ट्रुसार्डी डोना इओ डी' परफ्युम वापरते, कुठेही जाताना ती हाच परफ्युम लावते. केशरी फुले, वॉटर लिली, चमेली यांचे आकर्षक मिश्रण असलेला हा परफ्युन आहे. या परफ्यूमची किंमत 100ml साठी सुमारे 5,000 रुपये आहे.
Anushka Sharma’s Dolce & Gabbana Perfume - अनुष्का शर्माला कोणत्या प्रकारचा सुगंध आवडतो? बरं, तिला एबरक्रॉम्बी आणि फिच हा परफ्युन कपड्यांवर मारायला आवडतो. डोल्से आणि गब्बाना लाइट ब्लू रंगाचा परफ्युम अनुष्काचा आवडता आहे. या परफ्यूमची किंमत 100ml साठी अंदाजे 5,000 रुपये आहे.
Sonam Kapoor Ahuja’s Michael Kors Perfume - बॉलिवूडची फॅशनस्टार, सोनम कपूर आहुजा सर्वात महागड्या परफ्युमपैकी एक परफ्युम वापरते. तिने लावलेल्या परफ्यूमपैकी एक म्हणजे मिचल कॉर्सची ग्लॅम जास्मिन. या परफ्युमला सर्वात मोहक वास असल्याचे मानले जाते आणि सोनम या ब्रँडची मोठी चाहती आहे. Michael Kors Glam Jasmine ची किंमत 100ml साठी सुमारे 6,000 रुपये आहे.
Kareena Kapoor Khan’s Jean Paul Gaultier Perfume - शाही करीना कपूर खानच्या निवडी अगदी क्लासिक आणि अद्ययावत आहेत. तिच्या आवडता परफ्युम कोणता असू शकतो बरं? करीना जीन पॉल गॉल्टियरचा ए-लिस्टेड परफ्यूम वापरते. हा क्लासिक परफ्यूम 100ml साठी अंदाजे 7,000 रुपये किमतीत येतो.
बॉलीवूडची यंग ब्यूटी, तरुण अभिनेत्री, आलिया भट्ट जेव्हा तिच्या स्टाइलिंगचा विचार करते तेव्हा ती अतिशय आकर्षक लुकची निवड करते. तिचा फॅशन सेंस अतिशय उत्तम आहे. तिच्या परफ्यूम्स कलेक्शनमध्ये पुरुषांच्या परफ्युमचा देखील समावेश आहे. तिचा आवडता परफ्युम ब्ल्यू डी चॅनेल आहे. या परफ्यूमची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. फक्त 100ml साठी त्याची किंमत 25,000 रुपये आहे.
Sushmita Sen’s Elizabeth Arden Red Door Perfume - मिस युनिव्हर्स, सुष्मिता सेन आजही तितकीच मोहक आहे. तिने आपल्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. ती वापरत असलेल्या परफ्यूमपैकी एक म्हणजे एलिझाबेथ गार्डनचा रेड डोअर परफ्युम आहे. हे 100ml साठी अंदाजे 6000 रुपये किंमतीला येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT