अनेकांना परफ्युम किंवा अत्तर लावण्याची विशेष आवड असते. यात सुद्धा काही जण ठराविक सुवासाचं किंवा ब्रँडचंच परफ्युम वापरतात. परफ्युमच्या सुगंधामुळे मनावर आलेली मरगळ दूर होते. तसंच तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तीचा मूड सुद्धा छान होतो.
अनेकदा लोक परफ्यूमच्या सुगंधाचा वास घेतात आणि त्यानंतरच विकत घेतात. परफ्युम खरेदी करताना सर्वात खास गोष्ट म्हणजे ती योग्यवेळी खरेदी करावी.चला तर मग परफ्यूम खरेदीपासून तसेच त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.परफ्यूम खरेदी करताना हे लक्षात ठेवा की ते शरीराच्या नैसर्गिक सुगंधाला योग्य आहे.नॅचरल परफ्यूमचा सुगंध बराच वेळ टिकतो. अशावेळी केमिकलयुक्त परफ्युम खरेदी करणे टाळा.परफ्यूमची निवड नेहमी वेळेचं भान ठेवूनच करावी. दिवसा परफ्यूम वापरण्यासाठी हार्ड स्मेल परफ्यूम वापरा आणि रात्रीसाठी हलका स्मेल वापरा.परफ्यूम ड्रेसवर स्प्रे करण्याऐवजी बॉडीवर लावा जेणेकरून ही स्मेल बराच काळ टिकेल.परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी मानेवर स्प्रे करा. यासाठी सॉफ्ट परफ्यूम परफेक्ट राहिल.रात्रीच्या वेळी कानाच्या मागे परफ्यूम लावणे उत्तम. यासाठी बोटांवर थोडासा परफ्यूम लावून कानामागे लावा.परफ्यूम नेहमी स्प्रे करा आणि ते चोळणे टाळा. कारण परफ्यूम चोळल्याने त्याचा सुगंध पटकन उडून जातो.अनेकांना परफ्युम किंवा अत्तर लावण्याची विशेष आवड असते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.