photos sindhutai sapkal death supporters gathered for funeral esak
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी (ता.४) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले.
(छायाचित्र सौजन्य - शहाजी जाधव)
वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी सिंधूताई यांना हार्नियाच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या आजारावरील उपचारासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालूच होते. मात्र मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपचार सुरु असतानाचा त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतन येथे आणण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. सिंधुताई यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाप्रमाणे दफनविधी करण्यात आले. पुण्यातील नवी पेठेतील ठोसरपागा येथील दफनभूमीत शासकीय इतमामात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत, या मुलांची म्हणजेच अनाथांची माय अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.त्यांना आतापर्यंत संस्था, संघटना आणि राज्य व केंद्र सरकारच्यावतीने विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी आयुष्यभर केले. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.