Marine Drive Emmanual Yogini
विरंगुळ्यासाठी मुंबईकरांची पावलं पुन्हा समुद्राकडं
मुंबई : शहरात कोरोनाच्या निर्बंधात शिथीलता आल्यानं नागरिकांची आपल्या आवडत्या मरीन ड्राईव्हकडे पावलं वळू लागली आहेत. शनिवारी इथं अक्षरश: मुंबईकरांची झुंबड उडीली होती. (Photo - Emmanual Yogini
@EmmanualYogini )
मुंबईकरांच्या हृदयात खास जागा असलेला मरीन ड्राईव्ह आणि इथली संध्याकाळ खासचं. लोक या ठिकाणी दिवसभराचा शीण घालवण्यासाठी येतात. कोरोनामुळं लोकांच्या या हक्काच्या जागी फिरण्यासही निर्बंध आले होते. (Photo - ANI)मुंबई : कोरोनाचा धोका कायम असला तरी रुग्णसंख्या बरीच नियंत्रणात आल्यानंतर सरकारनं आता निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळं बऱ्याच काळापासून कोंडमारा झालेल्या मुंबईकरांची पावलं मरीन ड्राईव्हकडे वळाली नाहीत तरच नवलं! त्याचबरोबर आपल्या मोबाईलमध्ये इथल्या सूर्यास्ताची छबी टिपताना तरुण मंडळी. (Photo - ANI)मुंबई : आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा हा खास कट्टाच! मुंबईतल्या अबाल-वृद्धांना ही जागा माहिती नाही, असा निराळाच. म्हणूनच आता ही धोक्याची गर्दी दिसत असली तरी पूर्वीप्रमाणं मरीन ड्राईव्ह पुन्हा जिवंत झाल्याचं चित्र आहे. (Photo - ANI)मुंबई : एक निवांत संध्याकाळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यासाठी मरीन ड्राईव्हसारखी जागाच नाही, असंच जणू हे कुटुंबातील सदस्यही सांगत असतील. (Photo - ANI) सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.