Vande Bharat Express esakal
ताशी 200 किमी सुसाट वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला अपघातामुळं ब्रेक लागला.
Vande Bharat Express : ताशी 200 किमी सुसाट वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला अपघातामुळं ब्रेक लागला. या अपघातामुळं वंदे भारत एक्सप्रेसच्या इंजिनचा पुढचा भाग डॅमेज झाला.ही घटना गुरुवार 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास वटवा स्टेशनजवळ घडली. रेल्वे ट्रॅकवर म्हशी आल्यामुळं हा अपघात झाला. अपघातात जीवितहानी झालेली नाही. इंजिनच्या पुढच्या भागाची तातडीनं डागडुजी करून वंदे भारत एक्सप्रेस ठरलेल्या वेळेवर गांधीनगर येथून मुंबईसाठी रवाना झाली. कोचिंग केअर सेंटरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसच्या दुरुस्तीसाठी जास्त वेळ लागला नाही. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी रातोरात रेल्वेची दुरुस्ती केली.वंदे भारत रेल्वे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, बायो टॉयलेट, स्वयंचलित दरवाजे आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन पुश बटण यांचा समावेश आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.