नागपूर : आपल्याकडे धार्मिकदृष्ट्याच वड-पिंपळाचे महत्त्व बहुतेकांना माहीत आहे. परंतु, आरोग्यदृष्ट्याही वड-पिंपळासारख्या डेरेदार वृक्षांचे महत्त्व खूप मोठे आहे. यात पानांपासून सालापर्यंत पिंपळाच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहेत. याबाबत जाणून घेऊ या...
पिंपळाची पाने सुकवून वाटून घ्या. चमचाभर मधात ही चिमूटभर पूड घाला. यामुळे खोकला आणि कफाची समस्या दूर होते.पिंपळाच्या सालींचा काढाही घेता येईल. पिंपळाचे पिकलेले फळ खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.कफ, श्वसनाचे त्रास आणि अपचनासारख्या समस्याही दूर होण्यास मदत होते.पिंपळाच्या पानांचा किंवा खोडामधून निघणारा रस डोळ्यात घातल्याने जंतुसंसर्ग, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे यासारख्या समस्या दूर होतात.पाण्यात पिंपळाचे खोड उकळावे आणि त्या पाण्याने चुळा भराव्या. या उपायाने तोंड येणे, हिरड्यांची सूज यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.पिंपळाची पाने गरम करून सूज आलेल्या ठिकाणी बांधल्यास शरीरावरची सूज उतरते. पिंपळाच्या पानांचा रस घातल्याने कानदुखीपासून आराम मिळतो.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.