नवनवीन ठिकाणी फिरायला कोणाला आवडतं नाही. कुठेही फिरायला जायचं म्हणजे प्लॅनिंग करावे लागते. जसे की, कधी जायचं, कसे जायचे, किती दिवस जायचे पण सर्वात महत्त्वाचे असते, आपल्या बजेटमध्ये ट्रीप पूर्ण करणे. कोणत्याही ट्रीपसाठी बजेट सेट करणे खूप गरजेचे असते. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये ट्रीप प्लॅन करायची असेल तर तुम्ही कुठे फिरायला जाऊ शकता हे जाणून घेऊ या...
हंपी जगभरातील पर्यटकांचे फेव्हरेट ठिकाण आहे. तुंबभद्रा नदीच्या किनारी वसलेलं हंपी हे एक आकर्षण आहे जो तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. निर्सगरम्य आणि आश्चर्यचकीत करणारे ठिकाण पाहून तुम्ही नक्कीच ट्रीप एन्जॉय कराल. हंपीला जाण्यासाठी हॉस्पेट शहरापर्यंत स्वस्तामध्ये बसने जाऊ शकता. तेथून लोकल रिक्षाद्वारे तुम्ही हंपीला जाऊ शकता. दार्जिलिंगमध्ये विदेशी चहाचा स्वाद, टॉय ट्रेन आणि विक्टोरियन युगाची ओळख मानली जाते. थंड हवासोबत एक गरम चहा आणि नयनरम्य डोंगरांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता. दमन आणि दिव हे खूप सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील चांगल्या वातावरणात आणि निर्सगरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता. येथे जाण्यासाठी बस हा सर्वात स्वस्त मार्ग आहे.
हिमालयमध्ये बिनसर हे आरामदायी ट्रीप साठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे निवांत आराम करु शकता दिल्लीपासून 300 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथे तुम्ही वाईल्डलाईफ सफारीचा आनंद घेऊ शकता. बिनसर जाण्यासाठी बस हा सर्वात स्वस्त उपाय आहे. तुम्हाला येथे जाण्यासाठी कोणतीही डायरेक्ट बस नाही. तुम्हाला नैनीताल आणि अल्मोडा येथू बस बदलावी लागेल.ऐतिहासिक स्मारकांपासून ते सुंदर समुद्र किनाऱ्यांपर्यंत आणि मंदिरांपासून चर्चपर्यंतचे सफर घडविणारे पाँडिचेरी हे भारतातील सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथील फ्रेंच कॉलनीमध्ये सुंदर वास्तू आहेतब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.