Plant these 5 trees on the balcony; The house will look beautiful Sakal
अनेकांना झाडं लावायची खूप हौस असते. परंतु जागेअभावी त्यांना ती लावता येत नाहीत. मग अनेकजण आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये छोटी-छोटी झाडं-फुलझाडं लावून आपली इच्छा पूर्ण करतात. या झाडांमुळे घराची शोभा तर वाढतेच, शिवाय घरातील वातावरणही प्रसन्न होतं. या झाडांसोबत थोडा वेळ घालवल्याने मनही प्रसन्न होतं आणि सोबत आपली गार्डनिंगची हौस देखील पूर्ण होते. तुम्हीसुद्धा तुमच्या घराच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये फुलझाडं लावायचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा 5 झाडांबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही तुम्ही अगदी सहज लावू शकता. (Plant these 5 trees on the balcony; The house will look beautiful)
1) तुळस (Ocimum sanctum)- तुम्ही तुमच्या घरात तुळसीचं छोटसं रोपटे लावू शकता.वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायऑक्साईड हवेत सोडते. म्हणून ती दारात असावी, असा जेष्ठ मंडळीचा आग्रह असतो.2)कढीपत्ता (Curry leaves plant) - फोडणीची चव जर कोण वाढवत असेल, तर तो आहे कढीपत्ता. फोडणीत कढीपत्त्याची पाने तडतडली की, त्याचा घमघमाट घरभर होतो. हा कढीपत्ता बाजारातून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी उगवलाच तर किती बरे होईल ना? म्हणून तुम्ही तुमच्या घरात कढीपत्ता लावू शकता.
3)कोरफड (Aloevera)- कोरफडीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुमच्या घरात, कोरफडीच झाड नक्कीच हवे. त्यामुळे तुम्ही आवर्जून कोरफड लावा. कोरफड एकदा जगली की, वाढत राहते. वाळवंटातील इतर झाडांप्रमाणे कोरफडीचे गुणधर्म असल्यामुळे त्याला फार पाणी लागत नाही. या झाडाला छान फुलंदेखील येतात. जी लीलीसारखी दिसतात. कोरफडीचा उपयोग तुम्हाला त्वचेसाठी, आरोग्याच्या इतर तक्रारीसाठी नक्की होऊ शकतो.
4)पुदिना (Wild mint)- पुदिना घालून केलेली चटणी अप्रतिम लागते. अनेकदा जेवण पचावे म्हणून त्यात पुदिना टाकला जातो. उन्हाळ्यात तर पुदीना -कैरीची चटणी घालून भेळ केली तर तोंडाला चांगली चव येते. तुम्ही जर बाजारातून पुदिना आणला असेल तर तुम्ही तो पाण्याच्या ग्लासात ठेवून द्या. त्याला कोंब फुटल्यानंतर तुम्ही एखाद्या बसक्या भांड्यात पुदिना लावा. पुदिना नेहमी पसरत जातो. त्याची योग्यवेळी छाटणी करत राहा.
5)जास्वंद (Shoeblackplant)- आता तुमच्याकडे सगळी फायद्याची झाडे झाली, तुमच्या खिडकीत एखादे तरी फुलझाड हवेच ना..! जास्वंदाच्या झाडाला आपण अधिक पसंती देऊ, कारण जास्वंदाचे झाड हे बहुगुणी आहे. लाल, गुलाबी, केशरी, पांढरा, पिवळ्या अशा विविध रंगात जास्वंदाची फुले येतात. या फुलांना सुवास नसला तरी ही फुले दिसायला छान दिसतात. जास्वंदाची पाने गरम तेलात बुडवून ते तेल केसांना लावले जाते. ज्यामुळे केसही छान होतात. या झाडाला बारमाही फुले येतच असतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.