PM Narendra Modi with his Mother Hiraben modi Sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल गुजरातमधल्या गांधीनगर इथं आपल्या आईची भेट घेण्यास गेले होते. पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली. शनिवारी सकाळी मोदी गांधीनगर इथं आले होते. त्यांनी आपल्या आईची भेट घेतली. त्यांचे पाय धुवून पूजा केली आणि आशिर्वादही घेतले.
याबद्दल मोदींनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने आज आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले, असं मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी आईला भेटले होते. हिराबेन मोदी यांचा आज १०० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त गांधीनगरमधील एका रस्त्याला त्यांचं नाव दिलं जाणार आहे.
गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबा १०० वर्षांच्या होत आहेत. आहेत. त्यानिमित्ताने शहरातल्या लोकांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन रायसन पेट्रोल पंपापासून ८० मीटरच्या रस्त्याला पूज्य हिराबा मार्ग असं नाव दिलं जाणार आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.