Maharashtra Political Crisis esakal
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळेच व्यस्त असल्याचं चित्र आहे. राजकीय घडामोडींवर नजर टाकली, तर सर्वात मोठा धक्का ठाकरे घराण्याच्या राजकारणाला बसताना दिसत आहे. कारण, आसाममधील गुवाहाटी (Guwahati in Assam) गाठलेले बंडखोर आमदार स्वतःला खरे शिवसैनिक म्हणवून घेत आहेत. मात्र, केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर प्रदेशपासून पंजाब, दिल्लीपर्यंत देशातील अनेक बडे राजकीय घराणी संकटात सापडल्याचं दिसत आहे.उत्तर प्रदेशातील यादव कुटुंब (Yadav Family) : यूपीचे दिग्गज नेते आणि वडील मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्याकडून कमान हाती घेतल्यानंतर, समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) सुप्रीमो अखिलेश यादव (Akhilesh Yadav) अजूनही मोठ्या यशाच्या शोधात आहेत. 2014, 2017, 2019 आणि 2022 मध्ये पक्षाचा सातत्यानं पराभव झालाय. यूपी पोटनिवडणुकीत पक्षाला आझमगड आणि रामपूरसारख्या जागा गमवाव्या लागल्या. प्रचारासाठी एकदाही अखिलेश इथे पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले.पंजाबमधील बादल कुटुंब (Badal Family) : एनडीएशी युती करून एकेकाळी पंजाबमध्ये (Punjab) राज्य करणाऱ्या बादल कुटुंबाच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल आता संकटाचा सामना करत आहे. कुटुंब आणि पक्षाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल (Parkash Singh Badal) यांनी इथं दशकभर मुख्यमंत्री म्हणून राज्य केलं. आता परिस्थिती अशी झालीय की, संगरूर पोटनिवडणुकीत पक्षाला डिपॉझिटही वाचवता आलं नाही. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत विक्रम सिंह मजिठियासह अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.दिल्लीत गांधी परिवार : 2014 पासून आतापर्यंत काँग्रेस (Congress) आणि गांधी परिवाराला (Gandhi Family) अनेक राजकीय धक्के बसले आहेत. 2018 मध्ये पक्षानं तीन राज्ये जिंकली असली, तरी नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचा विजय होऊनही पक्ष एका जागेवर घसरलाय. त्याचवेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या हातून दारूण पराभव होऊन काँग्रेसची सत्ता गेली. परिस्थिती इतकी बिघडली की, पक्षानं यूपीची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पंजाबमधील राजेंद्र नगर आणि संगरूर येथील दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाची जमानत जप्त झाली होती. ही दोन राज्ये आहेत, जिथं एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती.महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंब (Thackeray Family) : शिवसेनेला (Shiv Sena) पहिल्यांदाच बंडखोरीचा सामना करावा लागत नाहीय, याआधी देखील पक्षात बंडखोरी झालीय. यावेळी परिस्थिती आणखी बिकट होताना दिसत आहे. या बंडखोरीनंतर एकुलता एक मुलगा आदित्य ठाकरे हे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मंत्री-आमदार म्हणून उभे असल्याचं वृत्त आहे. गुवाहाटी, आसाममध्ये पक्षाच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. सध्या विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांचं संख्याबळ 55 आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.