बॉलिवूडची 'पॉप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका उषा उथ्थप यांना त्यांच्या जड आवाजामुळे हिणवलं जायचं, पण त्याच आवाजामुळे आज उषा यांची एक वेगळी ओळख आहे. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
उषा यांनी करिअरची सुरुवात हॉटेल्समध्ये गाणी गाऊन केली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील टॉक ऑफ द टाऊन आणि कोलकाता येथील ट्रिंक्स यांसारख्या नाइटक्लबमध्ये गाणी गायली. उषा यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी झाली. दिल्लीतील एका पार्टीत उषा गाणं गात असताना शशी कपूर यांची नजर तिच्यावर खिळली आणि त्यांच्या आवाजाने प्रभावित होऊन शशी कपूर यांनी त्यांना चित्रपटात गाणी गाण्याची ऑफर दिली.
'हरे रामा हरे कृष्णा' या गाण्याने उषा उथ्थप यांनी चित्रपटात पदार्पण केलं.उषा यांना कांजीवरम साडी आणि कपाळावर मोठी गोल बिंदी लावण्याची खूप आवड आहे. त्यांनी अनेक वर्षे हा ट्रेंड, हा लूक कायम ठेवला आहे.मुंबईत जन्मलेल्या उषा या तमिळ ब्राह्मण कुटुंबातील आहेत. वजनदार आवाजामुळे उषा यांना अनेकदा संधी मिळाली नाही पण त्यांनी कधीच हार मानली नाही.
उषा यांनी हिंदी आणि इंग्रजीचसोबतच १६ भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यामध्ये गुजराती, मराठी, कोकणी, डोंगरी, खासी, सिंधी आणि ओडिया यांचा समावेश आहे. याशिवाय त्या स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, सिंहली आणि रशियन या परदेशी भाषांमध्येही गातात.
१९६९ मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी चेन्नई येथे त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता.उषा यांनी त्यांची बहुतेक गाणी ही आरडी बर्मन आणि बप्पी लहरी यांच्यासोबत गायली आहेत. याशिवाय विशाल भारद्वाज यांच्या सात खून माफ या चित्रपटातील रेखा भारद्वाजसोबत गायलेल्या 'डार्लिंग' या गाण्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. उषा यांनी जगातील प्रत्येक मोठ्या शहरात आपला परफॉर्मन्स दिला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.