फोटोग्राफी

नोकरीपेक्षा शेती भारी! कोकणच्या तांबड्या मातीत बटाट्याची लागवड

राजेंद्र बाईत

तालुक्यातील गोठणेदोनिवडे राघववाडी येथील उद्यमशील शेतकरी संतोष राघव यांनी अर्जुना नदीच्या काठावरील शेतजमीनीमध्ये प्रायोगिक तत्वावर बटाट्याची लागवड केली आहे. भाडे कराराने शेतजमीन घेवून विविधांगी प्रकारची सेंद्रीय शेती करणारे राघव यांनी बटाटा लागवडीचा केलेला प्रयोग तालुक्यातील बहुतांश पहिला प्रयोग ठरला आहे.

या प्रयोगामुळे आता कोकणच्या तांबड्या मातीतील बटाट्याचा वेगळा स्वाद अनुभवता येणार आहे. अर्जुना नदीच्या काठावरील शेतजमीन भाडेकराराने घेवून गोठणेदोनिवडे येथील राघव गेल्या पाच वर्षापासून विविधांगी प्रकारची शेती करत आहेत.
वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला लागवडीसह कलिंगड, मिरची, मका, वांगी, भेंडी, कारली, वाली आदीची पिके ते घेतात. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा विक्रीचाही व्ययवसाय करतात.
शिक्षणानंतर कोकणी तरूणाप्रमाणे नोकरीसाठी मुंबईची वाट धरण्यापेक्षा संतोष यांनी सैन्यामध्ये जाण्याचे स्वप्न पाहीले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचे स्वप्न अधुरे राहीले. काही महने होमगार्ड म्हणूनही काम केले.
विचारे कुटुंबियांच्या शेतामध्ये विविधांगी पिके घेणारे उत्तरप्रदेशमधील ब्रीजभान आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करण्याला सुरूवात केली. कुटुंबियांच्या प्रोत्साहन, मार्गदर्शनातून संतोष गेली पाच वर्ष सुमारे दोन एकर 28 गुंठे जागेमध्ये विविध प्रकारची शेती करतात.
यावर्षी त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करताना सुमारे दोन गुंठे जागेमध्ये बटाट्याची लागवड केली आहे. गादी वाफे तयार करून दोन सरींमध्ये सुमारे दोन फुटाचे अंतर असलेल्या चौदा सरी तयार केल्या. त्यामध्ये त्यांनी इंदूर बटाटा या जातीची लागवड केली आहे.
जादा उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकर्‍यांकडून रासायनिक खताची जादा मात्रा पिकाला दिली जाते. मात्र, संतोष राघव यांनी त्याला फाटा देताना रासायनिक खताचा उपयोग करण्याऐवजी शेणखताचा जास्त उपयोग केला आहे. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असलेले दर्जेदार आणि रासायनिक मात्रा नसलेले सेंद्रीय उत्पादन देण्यावर त्यांनी भर दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुती सरकारनं काढलेला SC-ST उपवर्गिकरणासंबंधीचा जीआर रद्द होणार? राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संकेत

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्स फक्त ३ खेळाडूंना रिटेन करणार, नावं समजली; कोचच्या पदासाठी भारताचा माजी फलंदाज आघाडीवर

Latest Maharashtra News Updates : वाघोली, खराडी भागात पावसाला सुरुवात

Buldhana Assembly Election 2024 : दिवाळीच्या थंडीत राजकारण तापणार! फटाके कोण फोडणार आणि कुणाला लागणार याचीच सर्वत्र चर्चा

IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय

SCROLL FOR NEXT