मातीची भांडी अगदी सुरुवातीपासूनच भारतीय संस्कृतीचा एक भाग आहेत. मात्र सध्याचे डिजिटल युग आणि आधुनिक काळात ही भांडी जवळपास सर्वच घरांमधून गायब झाली असल्याचे चित्र आहे. गावात पूर्वी मातीच्या मडक्यात अन्न शिजवलं जात होतं, त्या शिजवल्या जाणाऱ्या मडक्याला 'हंडी' असं म्हणत असतं. आता फक्त मातीच्या भांड्यांच्या नावाने काही घरांमध्ये मातीचे भांडे दिसून येतात. मात्र ती वापरण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.
या भांड्यांची जागा आता अद्ययावत स्टील, तांबे किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली आहे. पण मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ते अन्नातील पोषक द्रव्ये टिकवून ठेवतातच शिवाय त्या पदार्थात एक नवी चव आणतात. आज आपण मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.मातीची भांडी अन्नाची चव तर वाढवतातच शिवाय त्यात असणारे पोषक घटकही आपल्याला मिळतात. यातून तुम्हाला लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मिळतात. या भांड्यांना लहान, दृश्यमान नसलेली छिद्रे असतात आणि अन्न शिजवताना ते उष्णता आणि ओलावा समानतेने वितरित करतात. अशा प्रकारे अन्नाचे पोषण अबाधित राहते.मातीच्या भांड्यांचे क्षाराचे स्वरूप तुमच्या अन्नात असलेल्या अॅसिडवर प्रतिक्रिया देते आणि त्याची pH पातळी संतुलित करते. त्यामुळे ते अन्न अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट बनते.हंड्यामध्ये एखादा पदार्थ शिजवताना तेल कमी वापरले जाते. कारण ते अन्नामध्ये नैसर्गिक तेल आणि ओलावा टिकवून ठेवते. अशा हंड्यांमध्ये शिजवलेले अन्न हृदयासाठी सर्वोत्तम आहे. स्टीलच्या भांड्यांच्या तुलनेत अन्न शिजवण्यास कमी वेळ लागतो.मातीची भांडी देशभरात सहज आणि कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे अशी भांडी तुम्ही सहज खरेदी करु शकता. तुलनेत इतर धातूंची भांडी ही महाग असतात. त्यामुळे या भांड्यात अन्न शिजवल्याने तुमच्या आरोग्यालाही फायद्याचे होईल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.