Pradeep Patwardhan passed away esakal
Pradeep Patwardhan: मराठी मनोरंजन विश्वाला आज मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध कलावंत प्रदीप पटवर्धन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे (Marathi Actor) हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून (marathi entertainment news) प्रदीप यांनी मराठी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. खडतर संघर्षातून त्यांनी स्वताच्या अभिनयाच छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. प्रदीप हे जनमाणसात लोकप्रिय असणारे अभिनय होते. त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा होता. (Moruchi Mavshi)
90 च्या दशकांत मराठी नाटकांतून प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या प्रदीप यांची नाट्यकीर्द मोठी होती. प्रदीप यांची ओळख झाली ती मोरुची मावशीतूनच. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. त्यांची ती ओळख कायम राहिली. प्रदीप पटवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोला बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मोरूची मावशी या नाटकाला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
प्रदीप यांचे हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन त्यांनी केले होते. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत त्यांनी काम केले. पुढे ते व्यावसायिक नाटकाकडे गेले. मराठी रंगभूमीवरील प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.