Precautions to be taken in Pregnancy Esakal
गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची काळजी (Precautions to be taken in Pregnancy):
मातृत्व हे स्त्रियांना मिळालेलं वरदान आहे. आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी खास अनुभव असतो. म्हणूनच गर्भवती (Prengnant) असताना स्त्रियांनी काही खास गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे. जेवणापासून ते आपल्या जीवनशैलीपर्यंत स्त्रियांना (Pregnant Women) या काळात बदल करावे लागतात. बऱ्याचदा गर्भवती महिलांकडून अजाणतेपणी काही चुका (Mistakes) होतात, ज्या त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. आज आपण अशाच गोष्टींची चर्चा करणार आहोत, ज्यांच्यापासून गर्भवती महिलांनी वाचायला हवं.
1. आहार (Diet)- गर्भवती स्त्रियांनी हे लक्षात ठेवायला हवं की त्यांचा आहार फक्त त्यांच्यावरच नाही तर त्यांच्या गर्भातील बाळावरही परिणाम करणार आहेत. एक गर्भवती मातेला रोज 1800 ते 2000 कॅलरी आणि तिच्या गर्भातील बाळासाठी 300 कॅलरीची गरज असते.2. सेल्फ-मेडिकेशन (Self Medication)- गर्भवती महिलांनी कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. 3. अपुरी झोप (Insufficient sleep)- कोणत्याही गर्भवती स्त्रीला शारीरिक आणि हार्मोनल विकासासाठी आरामाची नितांत गरज असते. रोज कमीत कमी आठ तास झोप घेणे महत्त्वाचं आहे.
4. व्यायाम (Exercise)- गर्भावस्थेमध्ये सोपे व्यायाम आणि शारीरिक हालचाली करणं फायदेशीर ठरतं.5. जीवनशैली (Lifestyle)- गर्भावस्था हा आयुष्यातील असा काळ असतो, जो तुमच्या आणि तुमच्या होणाऱ्या बाळाच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करणारा असतो. त्यासाठी आत्ता घेतलेली योग्य खबरदारी आयुष्यावर परिणाम करते. त्यासाठीच आपला योग्य असा प्लॅन बनवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.