Pulse Polio In Parbhani esakal
परभणी जिल्ह्यात आज रविवारी (ता.२७) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ११ हजार ९३३ बालकांना १ हजार ५५३ केंद्रांवर पोलिओ डोस देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते यांनी दिली आहे. (सर्व छायाचित्रे - योगेश गौतम)
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपली लेक निश्वीसह पोलिओ केंद्राला भेट दिली. यावेळी निश्वीला पोलिओ डोस देण्यात आला.पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील १ लाख ५७ हजार ९३२ तसेच मनपा क्षेत्रात ५४ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्या करिता ग्रामीण भागात १ हजार १७४, शहरी भागात १६९ आणि मनपा अंतर्गत २१० असे एकूण १ हजार ५५३ केंद्रांवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.या व्यतिरिक्त बस डेपो, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी सुध्दा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामीण व शहरी भागात ३ हजार ४७३ आणि मनपा भागात ६२० असे एकूण ४ हजार ०९३ आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून, अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे.५ वर्षे पर्यंतच्या बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे.सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त मा देविदास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे, अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रकाश डाके यांनी केले आहे.पल्स पोलिओ केंद्रछोट्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली रांगोळीआपल्या बाबाबरोबर पोलिओ डोस घेण्यासाठी आलेली चिमुकली.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.