गुलाल.....अबीर उधळत रंगली राहुल देशपांडेची संगीत मैफल esakal
पुणे - गुलाल हा गणपतीला प्रिय तर विठ्ठलाला पांडुरंगाला अबीर.....गणेशापासून सुरू झालेली सूरांची मैफल अखेर कानडा राजा विठ्ठलापर्यंत येऊन थांबली. निमित्त होते राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे. ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये सोमवारची रात्री तरूण गायक राहुल देशपांडे यांची गायनाची मैफल झाली. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या बंदिशीने सुरू झालेल्या मैफलीची सांगता “कानडा राजा पंढरीचा’’ या भैरवीने झाली.
या मैफलीत राहुल देशपांडे यांना निखिल फाटक आणि प्रसाद जोशी यांनी तबला, मिलिंद कुलकर्णी हर्मोनियम, रोहन वनगे ऑक्टोपॅड, अमृता ठाकूरदेसाई कीबोर्ड आणि हृषिकेश पाटील - संपदा कुलकर्णी यांनी तानपु-यावर साथसंगत केली.
कार्यक्रमाचा आरंभ राहुल देशपांडे यांनी आपले आजोबा डॉ वसंतराव देशपांडे यांनी जोगकंस रागात बांधलेल्या “गुलाल...अबीर उडाया” या बंदिशीने केली. हे सांगताना आजोबांनी खूपच काम केले आहे ते पुढे नेण्याचा मी प्रय़त्न करतोय असे त्याने नम्रपणे सांगितले अन रसिकांची पहिली टाळी मिळवली “सिर पे शेरा बंधायो” ही बंदिश सादर केली. त्यानंतर राहुल देशपांडे हे आबुधाबीत कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेथे तयार होत असलेल्या पहिल्या हिंदू मंदिराला भेट देऊन मंदिरासाठी वीट दिली याचा अनुभव कथन केला.
उत्तररंगासाठी रंगमंचावर रसिकांच्या फर्माईशींचा गठ्ठा घेऊनच राहुल देशपांडे यांनी स्वरमंचावर पदार्पण केले. अष्टविनायक चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा …’ या गाण्यातून श्री गणेशाला वंदन करून केली. त्यानतंर आपण कट्यार काळजात घुसली या नाटकातील पद सादर करणार असल्याचे सांगताच रसिकांनी टाळ्या वाजवल्या पण आपण घेई छंद मकरंद सादर करणार नसल्याचे सांगत ‘तेजो निधी लोह गोल…’ सादर केले. त्यानंतर मात्र रसिकांची फर्माईश असल्याने ‘घेई छंद मकरंद…’ हे पद सादर करून रसिकांना खूष केले.३४व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक उस्ताद सुजाद खान यांच्या सितार वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.उस्ताद सुजाद खान यांनी राग शुद्ध कल्याण मधील ‘ बाजो रे.. बाजो रे .. ही पारंपारिक बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांनी विलंबित तीन ताल, द्रुत तीन तालातील वेगवेगळ्या ताणा, सरगम आणि सतारीचे सर्व वैशिष्ट्ये पेश केले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.