Pune Rain Photos esakal
फोटोग्राफी

Pune Heavy Rain Photos: पुण्यात रात्रभर नॉनस्टॉप धो-धो कोसळला, पावसाचे भयानक दृश्य कॅमेरात कैद! हैराण करणारे फोटो पाहा

Pune Rain Update: खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २७,२०३ क्यूसेक्स विसर्ग वाढवून सकाळी ६:०० वाजता ३५,५७४ क्यूसेक्स करण्यात आला होता .

Sandip Kapde
Pune Heavy Rain Photos

काल रात्रीपासून पुण्यात मुसळधार पाऊस झाला, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे

Pune Heavy Rain Photos

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २७,२०३ क्यूसेक्स विसर्ग वाढवून सकाळी ६:०० वाजता ३५,५७४ क्यूसेक्स करण्यात आला होता .

Pune Heavy Rain Photos

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.

Pune Heavy Rain Photos

त्यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Pune Heavy Rain Photos

त्यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Pune Heavy Rain Photos

नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Pune Heavy Rain Photos

पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Pune Heavy Rain Photos

खडकवासला धरण परिसरात १०० मिमी, तर घाटमाथ्यावर २०० मिमी पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

Pune Heavy Rain Photos

आवश्यकतेनुसार विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी

Pune Heavy Rain Photos

भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर, डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, कॉर्पोरेशन जवळील पूल बंद

Pune Heavy Rain Photos

होळकर पूल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Pune Heavy Rain Photos

काल सकाळी (२४/०७/२०२४) सात वाजेपासून आज (२५/०७/२०२४) पहाटे पाच वाजेपर्यंत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात आलेली माहिती

Pune Heavy Rain Photos

झाडपडी: ३८, घरपडी: ०२, पाणी शिरले: ०४, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम करत आहेत.

Pune Heavy Rain Photos

विजेचा शाँक लागून मृत्यू

पूलाची वाडी येथे विजेचा शाँक लागून तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघे अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आल्याने तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचले होते.

Pune Heavy Rain Photos

वाहतूक बंद

बोपोडीतील हॅरिस ब्रिजखाली पाणी आल्याने भाऊ पाटील रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे.

Pune Heavy Rain Photos

गोखलेनगर जनवाडी कालिका माता मंदिर परिसरात झाड पडल्यामुळे वीजेचा खांब देखील पडला आहे. या ठिकाणी वाहतुकीला अडचण झाली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

Pune Heavy Rain Photos

परिसरात पाणी साचले

जोरदार पावसामुळे सूसगावच्या महादेव नगर येथील रस्त्यावर वाहत असलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. बालेवाडी येथे अनेक भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Pune Heavy Rain Photos

खराडी केशवनगरला जोडणाऱ्या जॅकवेल बंधाऱ्याजवळ पाणी वेगाने वाहत आहे त्यामुळे दोन्हीकडची वाहतूक थांबविण्यात आलेली आहे.

Pune Heavy Rain Photos

कात्रज परिसरात पावसाने रस्ते जलमय

कात्रज परिसरात रात्रीपासून पावसाचा मोठ्या प्रमाणावर जोर सुरू आहे. अनेक भागात पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. कात्रज पेशवे तलाव पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.

Pune Heavy Rain Photos

तसेच, तलावाचे पाणी पूर्णपणे सोडण्यात आले आहे त्यामुळे कात्रज नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय ओढा येथून आंबील ओढ्यामध्ये पाणी पुढे जात आहे.

Pune Heavy Rain Photos

कात्रज मांगडेवाडी रोड प्रगती अपार्टमेंटसमोर खाजगी कंपनीची भिंत कोसळली, अनेक ठिकाणी झाडे देखील पडली.

Pune Heavy Rain Photos

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील विविध गल्ल्यातील रस्त्यावरून उताराने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Pune Heavy Rain Photos

निवारणाचे आवाहन

नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे आणि आपत्ती काळात सुरक्षित राहावे.

Pune Heavy Rain Photos

पाण्याचे व्यवस्थापन

पाण्याचे व्यवस्थापन त्वरित करावे आणि पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Pune Heavy Rain Photos

कर्वेनगर परिसरात रस्त्यांवर साचलेले गुडघाभर पाणी

मोरेश्वर अपार्टमेंट, इद्रपुरी अपार्टमेंट, राहुल कॉम्प्लेक्स, आणि चिंतामणी सोसायटीत वाहने पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Pune Heavy Rain Photos

स्पेनर्स चौकातील पाण्याचा तळ

कर्वेनगर मधील स्पेनर्स चौकात ड्रेनेजचे पाणी चेबर्स बाहेर येत असुन रस्त्यावर तळे साचले होते.

Pune Heavy Rain Photos

समर्थपद परिसरातील तलाव सदृश परिस्थिती

चौकात तलाव निर्माण झाला असून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळील उपरस्त्यावरून पाण्याचा प्रवाह मोठा होता, त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

Pune Heavy Rain Photos

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढलेली समस्या

क्रिएटिव्ह फाऊंडेशन चे संदिप खर्डेकर यांच्या मते, प्रशासनाने मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मागणी केली होती, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Pune Heavy Rain Photos

हडपसर-मांजरी परिसरातील जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे हडपसर-मांजरी परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे आणि अनेक घरांत पाणी शिरले आहे.

Pune Heavy Rain Photos

मांजरी खुर्द व बुद्रुक गावांना जोडणारा पूल पाण्याखाली

मुळा मुठा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे असा सल्ला दिला जात आहे.

Pune Heavy Rain Photos

ससाणेनगर व सय्यद नगर येथील पाण्याने भरलेली घरे

या परिसरातील घरे पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या वारंवार निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT