आज पंजाब,यूपी, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक 2022चे निकाल समोर आहे. या निवडणूकीच्या शर्यतीमध्ये कोण बाजी मारेल याची वाट जनता पाहात होती. यूपीवर सर्वांनी लक्ष्य ठेवले होते. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने येथे विजयाचा झेंडा रोवला आहे तर पंजाबमध्ये विधानसभा निवडवणूकीबाबत सांगायचे झाले तर येथए बीजीपी आणि काँग्रेसला मात देत आम आदमी पार्टीने बाजी मारली आहे.
पंजाबमध्ये AAP चा बोलाबाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक खूप क्युट व्यक्ती आनंद साजरा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये पोहचला.
''पंजाबवालों तुस्सी कमाल कर दित्ता'' आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करतो, पंजाब. हा निकाल म्हणजे जबरदस्त 'इन्किलाब' आहे. मोठ्या जागांना धक्का दिला आहे अशी भावना आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.
आम आदमी पार्टिला आज भरपूर बहूमत मिळाले. तर काँग्रेस त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीएम चन्नी, नवज्योत सिंह सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंह, प्रकाश सिंह बादल यांसारख्या दिग्गज नेत्यांना यावेळ AAP ने मागे टाकले आहे. अशामध्ये बेबी मफ्लर मॅन विजयाचा आनंद साजर करण्यासाठी सहभागी झाला. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या ऑफिसमध्ये उत्साह साजरा करताना दिसत आहे. लोक अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत आहे. निवडणूक आयोगनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने ८९ आणि शिरोमणी अकाली दलने ७, काँग्रेसने १३ आणि ८ जागांवर इतर लोक आहेत. या विजयोत्सावामध्ये बेबी अरविंद केजरीवाल देखील पोहचले होते. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला भरघोस मते मिळाण्याचा फायदा एप्रिलमध्ये होणाऱ्या पंजाबमधील पाच राज्यसभेच्या जागांच्या निवडणूकीमध्ये होईल. पंजाब शिवाय इतर शहरातही विजयोत्सव साजरा केला जात आहे.
बेबी मफलर मॅनचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
बेबी मफलर मॅनच्या नावाने प्रसिद्ध असलेला हा मुलगा दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गेटअपमध्ये तयार होतो,मागच्या वेळी २०२०मध्ये या मुलाने आम आदमी पार्टीच्या मुख्यालयामध्ये दिसला होता आता तो पंजाबमध्ये पोहचला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला भरघोस मते मिळाण्याचा फायदा एप्रिलमध्ये होणाऱ्या पंजाबमधील पाच राज्यसभेच्या जागांच्या निवडणूकीमध्ये होईल. पंजाब शिवाय इतर शहरातही विजयोत्सव साजर केला जात आहे.
''सुखबीर सिंग बादल हरले, कॅप्टन साहब हरले, चन्नी साहब हरले, प्रकाश सिंग बादल हरले, नवज्योत सिंग सिद्धू हरले, बिक्रम सिंग मजिठिया हरले. पंजाबने आश्चर्यकारक कामगिरी केली. भगतसिंग एकदा म्हणाले होते की इंग्रज गेल्यानंतर जर आपण व्यवस्था बदलली नाही तर काहीही होणार नाही. दुर्दैवाने गेल्या 75 वर्षात या पक्षांची आणि नेत्यांची तीच ब्रिटीश व्यवस्था होती, ते देशाला लुटत होते, शाळा/रुग्णालये बनवली नाहीत. 'आप'ने व्यवस्था बदलली'' असे मत केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
"'बाबा भीमराव आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. आता लोकांना राजकारणात एक पर्याय मिळाला आहे आणि पंजाबच्या लोकांनी त्या पर्यायाला संधी दिली आहे"' अशा भावना आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व्यक्त केली.
धुरीमधून आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान 58,206 मतांच्या फरकाने विजयी झाले. विजयानंतर संगरूर येथेजनतेशी संवाद साधताना, ''मी राजभवनात नव्हे तर, भगतसिंगांच्या खटकरकलन गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन. कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे फोटो नसतील, शहीद भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असतील, ' असे आश्वासन भगवंत मान व्यक्त केली.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.