radhanagari dajipur Wildlife Sanctuary  
फोटोग्राफी

छान किती दिसते फुलपाखरू! राधानगरी उद्यानात ५५ फुलपाखरांची नोंद

देशातील सर्वात मोठ्या 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखराची भर पडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या राधानगरीतील फुलपाखरू उद्यानात विविध प्रजातीच्या ५५ फुलपाखरांची नोंद झाली. त्यात देशातील सर्वात मोठ्या 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखराची भर पडली आहे. (radhanagari dajipur Wildlife Sanctuary)

या उद्यानात नुकतेच हे फुलपाखरू आढळले. यातून फुलपाखरू संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने या उद्यानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती आहेत.
निसर्गाच्या पुनर्निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा घटक अभयारण्यात मोठ्या संख्येने आढळतो. या पार्श्‍वभूमीवर उद्यानातही विविध प्रजातीची फुलपाखरे बघायला मिळत आहेत.
राधानगरी २०१५ साली राज्यातील पहिल्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन झाले. त्यावेळी हत्तीमहाल येथे फुलपाखरू उद्यान निर्मितीची संकल्पना पुढे आली.
निसर्ग पर्यटन योजनेतून निधी मंजुरीनंतर निसर्ग अभ्यासक सुहास वायगंणकर यांच्या मार्गदर्शनातून फुलपाखरू उद्यानाची निर्मिती केली.
हे उद्यान आता विविध प्रजातीच्या फुलपाखरांचे सुरक्षित आश्रय स्थळ बनले आहे.अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरले आहे.
या उद्यानात यापूर्वीचे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉरमॉन’ आणि सर्वात लहान ग्रास ज्वेल या फुलपाखरांची नोंद झाली आहे. - रुपेश बोंबाडे, बायसन नेचर क्लब राधानगरी
उद्यानात सदर्न बर्डविंग या फुलपाखराची नुकतीच नोंद झाली राधानगरीची जैवविविधता आणखीनच स्पष्ट होत आहे.आगामी काळात उद्यानात नावीन्यता निर्माण करण्याचे नियोजन आहे. - विशाल माळी, विभागीय अधिकारी, वन्यजीव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT