sanju samsonn lovestory sakal
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (IPL)ची आज फायनल मॅच खेळली जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये हा सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएल सीजनची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याची सगळ्या क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान २०२२ च्या या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने जबरदस्त परफॉरमन्स देत फायनल गाठली आणि याच सर्वाधिक श्रेय जात संघाचा कॅप्टन संजू सॅमसनला.
संजूने फक्त कॅप्टन म्हणूनचं नाही तर फलंदाज म्हणून सगळ्या सीजनमध्ये आपली वेगळी छाप सोडली. दरम्यान जितकी चर्चा त्याच्या खेळाची असते, तितकीचं त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीसुद्धा. मूळचा केरळचा असणारा संजू सॅमसन (२७)ने त्याची कॉलेज मैत्रीण चारुलतासोबत लग्न केले. पण या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.चारुलता सॅमसन मूळची केरळमधील तिरुवनंतपुरम येथील आहेत. चारुलता ही संजू सॅमसनची कॉलेजमधील मैत्रीण होती. संजू सॅमसनची पत्नी दिसायला फार सुंदर आहे. तिने तिरुअनंतपुरममध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केले. संजू आणि चारू यांनी तिरुअनंतपुरमच्या मार इव्हानिओस कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेतले. चारुलताने तिथून रसायनशास्त्रात पदवी घेतली. तर संजूने बीए पूर्ण केले. माहितीनूसार संजू सॅमसनने चारुलताला फेसबुकवर फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली होती आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली.५ वर्ष संजू आणि चारुलता रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर या दोघांनीही आपल्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगितले. संजू सॅमसन ख्रिश्चन आहे, तर चारुलता हिंदू नायर आहे. पण घरच्यांनी कुठलीही तक्रार न करता यांच्या नात्याला लगेच होकार दिला आणि थाटामाटात लग्न लावून दिले. दोघांनी २२ डिसेंबर २०१८ मध्ये कोवलम शहरात लग्न केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत यांच लग्न पार रडलं. दरम्यान, संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी कॅप्टन म्हणून जबरदस्त कामगिरी केली. संजूच्या नेतृत्वाखाली संघाने तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली. २०२२ च्या या सीजनमध्ये त्याने १६ सामन्यात ४४४ धावा केल्या आहेत. आणि आज फायनलमध्ये गुजरात संघासोबत त्यांची टक्कर पहायला मिळणार आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.