Eid 2022 : आज जगभरात रमजान ईदचा (Ramadan Eid) सण उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, एक दिवस आधीच चंद्र दिसल्यानं अनेक देशांनी 2 मे रोजी ईद साजरी केली. चला तर मग पाहूयात सुंदर फोटो..
दिल्ली : ईदच्या निमित्तानं आज सकाळी जामा मशिदीमध्ये (Jama Masjid Delhi) मुस्लिम बांधवांनी (Muslim) नमाज अदा केली आणि अल्लाहकडं शांती-समृद्धीसाठी प्रार्थना केली.मलेशियातील (Malaysia) क्वालालंपूरमधील राष्ट्रीय मशिदीबाहेर नमाजानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत होते.केनियातील (Kenya) नैरोबीमधील मशिदीत मुस्लिम बांधव नमाज अदा करत आहेत.ईद दिवशी इस्तंबूलमधील हागिया सोफिया मशिदीबाहेर मुस्लिम बांधव अल्लाहची प्रार्थना करत आहेत.इंडोनेशियातील (Indonesia) सुराबाया इथं रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी महिला प्रार्थना करतात.सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) रियादमध्ये नमाजापूर्वी किंग अब्दुलअजीज मशिदीबाहेर मुलं खेळताना दिसत होती.पाकिस्तानातील (Pakistan) पेशावरमध्ये ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आलं.जुन्या जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत मुस्लिम बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.थायलंडची (Thailand) राजधानी बँकॉकमध्ये ईदनिमित्त नमाज अदा केल्यानंतर मुली सेल्फी घेत आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.