ramazan 2022 best iftar snack recipe esakal
रमजानचा (Ramazan) पवित्र महिना सुरू होणार असून सर्वत्र तयारी पाहायला मिळत आहे. जगभरातील मुस्लिम बांधव हा महिना अत्यंत समर्पणाने साजरा करतात. रमजान हा वर्षाचा सर्वात पवित्र महिना असल्याचे म्हटले जाते. यावेळी अन्न व पाण्याशिवाय दिवसभर (सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत) उपवास करतात. मुस्लिम समाजात रमजानचा दिवस हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. एक महिना उपवास सोडताना इफ्तार खाल्ला जातो. तुम्ही तुमच्या कुटूंबासह किंवा मित्रांसह एकत्रितपणे या सोप्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता.
बोट कबाब (Boat Kabab)-
बोट कबाब हे मटणाचे मॅरिनेट केलेले तुकडे आहेत जे ग्रील्ड किंवा बेक केलेले असतात. स्नॅक्समध्ये खाणे हा एक चांगला पर्याय आहे.
बिर्याणी (Biryani)-
बिर्याणी ही भारतातील प्रत्येक नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींची पहिली पसंती आहे, त्यात काहीही गैर नाहीयेय. इफ्तारमध्ये बिर्याणी बनवून खा आणि त्याचा आस्वाद घ्या.
चिकन शवरमा (Chicken Shawarma)-
चिकन शवरमा ही अनेक लोकांची पसंती असते. दही आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून ते बनवा आणि वेगवेगळ्या चटण्यांसोबत सर्व्ह करा.
खीमा समोसा (Kheema Samosa) -
बटाट्याच्या समोस्याप्रमाणेच हा खीमा समोसा बनवला जातो. फरक एवढाच की, बटाट्याऐवजी मसाला खीमाने भरला जातो. समोशाचे पीठ मळून घ्या आणि आतमध्ये मसालेदार खीमा मसाला तळून घ्या.
नमकीन शेवई (Namkin Sewai)-
नमकीन शेवई हा एक टेस्टी स्नॅक आहे. हे पूर्णपणे वेगळे भाजून बनवले जाते. एका कढईत भाज्या तळून घ्या, त्यात घाला आणि चांगल्या प्रकारे शिजवून खा. नमकीन शेवई बनवून तुम्ही मुलांना पास्ता स्टाइलने खाऊही घालू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.